Bluepad | Bluepad
Bluepad
चिवर
आविनाश ढळे
आविनाश ढळे
25th Nov, 2022

Share

#चिवर#
आपन सर्वांनी भगवान बुद्धाच्या अंगावरती एक भगव्या रंगाचे वस्त्र पहिले असेल.....ते वस्त्र काय असते ? कसे असते ?? याबद्दल ची थोडक्यात महिती आज आपन पाहणार आहोत.....!!
तर प्रथम *चिवर* म्हणजे काय ते पाहू...
*बुद्धपुत्र श्रामनेर व भिक्षु यांना धर्मगुरूंच्या कडून विधिवत दिलेलं पित्तवस्त्र तथा काशाय वस्त्र म्हणजे चिवर होय*
# *चिवराची निर्मिती* :- *इ.स. पूर्व 528* साली भगवान बुद्धांना *बुद्धगया* येथे बुद्धत्वं प्राप्त झालं आणि त्यांनी आपल्या पहिल्या पाच बौध्द भीक्खुना *सारणाथ* येथे पहिले धम्म प्रवचन दिले. आणि भीक्खु संघाची स्थापना केली तेव्हा पासून चिवराची निर्मिती झाली.
*भीक्खुच्या अंगावर असणाऱ्या नारंगी (भगव्या) कपडास चिवर म्हणतात*
*काशाय वस्त्राचा अर्थ त्याग आहे*
*कसे असते चिवर*
विनया नुसार भिक्षुना 3 वस्त्रे धारण करवी लागतात.
*1. अंतरवास*
*2. उत्तरासन (5 हात लांब 4 हात रुंद)*
*3. संघारी*
*बौध्द धम्म आणि चिवर*
अ ) *चिवर* दहा तुकड्याचे आसवे *(दहा पारमिता)* त्याची पट्टी 65/27 इंच असावी.
ब ) त्याला 8 पट्टया असतात *(अष्टांग मार्ग)*
क ) चार कोपरे दुमडलेले आसवे *(चार आर्यसत्य)*
# *चिवर परिधान करण्याच्या पद्धती (दोन)* #
१. *एकांशि*:- एक खांदा उघडा असतो (बऱ्याचश्या बुद्ध मूर्ती किंवा बुद्धांच्या चित्रात या प्रकारचे *चिवर* परिधान केलेले असते)
२. ) *परिमंडल* :- संपूर्ण शरीर झाकलेले असते फक्त डोके आणि चेहरा उघडा असतो
# *चिवर घेण्यासठिचि बंधने* #
१. कुटुंबाची परवानगी
२. स्वतःची इच्छा
३. धम्माप्रति श्रध्दा
४. मनाने अपंग नसावा
५. पाप विचार मनात ठेवणारा नसावा
६. शरीराने अपंग नसावा
७. दोषी गुन्हेगार व्यक्ती नसावा. फरार चोरी खुनाचा आरोपी नसावा
चिवर
आपल्या जीवनात आपण भिक्खु नाही होऊ शकत आपल्या मुला, बाळा ला भिक्खु नाही बनऊ शकत. पण हे महान कुशल कर्म तर करु शकता चिवर दान करा आपन केलेल्या चिवर दाना मुळे जो कोणी ते चिवर परिधान करेल त्याचे उन,वारा,पाउस,मच्छर ,ईतर वस्तू पासुन रक्षण होईल आणी तो वंदनीय, पूजनीय ,धम्म प्रचारक होईल ते सर्व आपण केलेल्या चिवर दाना मुळे आपले शक्य होईल .
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷

173 

Share


आविनाश ढळे
Written by
आविनाश ढळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad