Bluepad | Bluepad
Bluepad
अहो माझ्याकडे बघा ना!
गजेंद्र गोविंदराव कुडमाते
गजेंद्र गोविंदराव कुडमाते
25th Nov, 2022

Share

अहो माझ्याकडे बघा ना!
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणींनो, कसे आहात, बरे आहात ना. परंतु मी बरा नाही आहे. माझे मन फारच व्याकूळ आणि खिन्न आहे. माझा असमर्थतेची मला लाज कमी राग जास्ती येत आहे. कारण जे मी आज बघितले ते सहसा बघवत नाही. ते बघून मनात सारखा एकच प्रश्न उद्भवतो, काय माणुसकी खरचं संपुष्टात आली आहे काय? आजचा हा प्रसंग मला आणि माझ्यासारखी भावना, संवेदना ठेवणारे माझे भाऊ बंध, मित्र मैत्रिणी यांना ही दुखी करणारा, डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. तो प्रसंग आठवला कि अपोआप डोळे पाणावून जातात. तर मित्रांनो, तो लाजीरवाणा प्रसंग मी तुमच्याशी शेअर करण्याची चेष्टा करतो आहे.
तर मित्रांनो, तुम्ही कधी किंवा रोजचं कामाने किंवा सहजच कुठे बाहेर रस्त्याने जात असता. तुमची गाडी ती कुठलीही असोत चालतं असते. झूर झूर वारा वाहत असतो. तेव्हाच तुमचा नाकाला असहनीय असा वास येतो, तेव्हा तुमचे लक्ष त्या असहनीय दुर्गंधेचा कारणाला शोधण्यासाठी तिकडे जाते. तो काय बघतो तर, रस्त्याचा कडेला एखादा कुत्रा, गाय, म्हैस आणि दुसरे एखादे जनावर मृत पडलेले असतात. तेथून ही दुर्गंध येत असते. तेव्हा श्वास रोखून किंवा रुमालीने नाक बंद करून कसे बसे तुम्ही तेथून निघून जाता, परत मागे पलटून ही बघत नाहीत. परंतु जर त्या ठिकाणी कुणी जिवंत मनुष्य किंवा प्राणी, पशु असेल तर काय करता. हाच लाजीरवाणा प्रसंग मला बघावयास मिळाला.
मित्रांनो, मी आधीच सांगितले आहे कि मी एक सरकारी कार्यालयातील कर्मचारी आहे. मला रोजचं कामावर जावे लागते. म्हणून मी त्या दिवशी सकाळी माझा कार्यालयाकडे जायला निघालो होतो. आमचा कार्यालयात दिल्लीवरून वरिष्ठ अधिकारी येणार होते. त्यांचा स्वागताचे साहित्य माझ्या कार्यालयातील अधिकार्‍यांनी मला आणायला सांगितले होते. कारण कि माझा घरचा रस्त्यावर बाजारपेठ पड़ते, म्हणून मी आदल्याच दिवशी कामावरून घरी जातांना ते साहित्य दुकानातून घेतले होते आणि घरी नेले होते. तेच साहित्य मी माझ्या सोबत घेऊन कार्यालयाकडे जात असतांना मुख्य हाइवेवर मला एक म्हैस पडलेली दिसली. ती चांगली खाऊन पिऊन धष्ट पुष्ट अशी दुध देणारी दिसत होती. त्या म्हशीला कुठल्यातरी वाहनाने धड़क दिलेली होती. तिचा शरीरातून रक्त आणि तिचा थनातून काहीसं दुध सुद्धा सांडलेलं होतं. ती अर्ध मरणाव्स्थेत पडली होती, कुठली गाडी़ तिचा जवळून गेली तर ती आशेने मान वर करून बघत होती. सोबतच एक पाय वर उचलत होती. जणू ती म्हणत होती "अहो माझ्याकडे बघा ना ! मला कुणीतरी वाचवा, माझी मदत करा ना " परंतु कुठलाच मनुष्य किंवा कुठलीच गाडी़ तीचाजवळ थांबत नव्हती. त्या धडक देणाऱ्याने फक्त तिचा अंगावर आणखी कुठले मोठे वाहन जाऊ नये म्हणून पोलिसांचा लोखंडी बॅरीकेट तिचा अवती भवती उभा केलेला होता.
माझी गाडी जेव्हा तेथून जाऊ लागली होती, तेव्हा ही तिने तेच केले. मी माझी गाडी़ रस्त्याचा कडे़ला थांबवली आणि तिचाकडे बघितले, पण काय तिचे नशीब आणि काय माझे नशीब. मी तिची मदत करण्यास असमर्थ होतो. त्या असमर्थतेचा मला फारच राग येत होता. सोबतच माझे कर्तव्य, माझी नौकरी मला सारखी हुटर वाजवून मला बोलावत होती. तर मी पुन्हा गाडी़ सुरु केली आणि कार्यालयाकडे निघून गेलो, बाकीचा लोकांप्रमाणे. मी पुढे पुढे चालत कार्यालयात पोहोचलो तरी माझे मन आणि ध्यान त्या रस्त्यावरील म्हशितचं राहिले होते. कार्यालयात येतांना रस्त्यात एक मंदिर वाटेत पड़ते. तेथे मी आवर्जून थांबलो, गाडी़वरचं बसून मी देवाला प्रार्थना केली, देवा त्या बिचार्‍या माउलीची रक्षा कर, कुणातरी तुझा दुताला, भक्ताला मनुष्य रुपात तेथे पाठव आणि तिचे प्राण वाचव, तीची मदत कर. त्यानंतर मी कार्यालयाकडे निघालो आणि पोहचलो. संपूर्ण दिवसभर माझा डोक्यात तेच चालतं राहिले, काय झाले असेल त्या माउलीचं ? काय ती जिवंत असेलं? कुणीतरी तीला वाचवले असेल काय? माझ मनं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होता. ती बिचारी एक पशु आहे आणि जर तेथे एखादा मनुष्य असता तर काय सगळे असे वागले असते काय? अहो एखादा साधा अपघात झाला, कुणातरी मनुष्याला साधं खरचटलं तरी लोकं त्या ठिकाणी गोळा होतात. रस्ता जाम होतो आणि जास्तीत जास्त झालं तर तो मनुष्य मरण पावला तर पोलीस येतात बॉडी उचलतात. परंतु पशु, जनावर यांचाबद्दल असे का बरं होत नाही. जनावर मरण पावला कि ते रस्त्याचा काठावर पडून राहतो. कुणीतरी एक मनुष्य येतो, त्या मृत जनावराचे कातड काढून नेतो आणि तो देह तेथेच तसाच सडण्यास सोडून जातो. म्हणजे तो मातीचा देह मातीतचं मिळून जातो.
आता मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो कि याउलट पाश्चात्य देशात म्हणजे भारताचा बाहेरील देशात असे काही नाही होतं. तेथे मनुष्य तर मनुष्य जनावरांची सुद्धा काळजी घेतली जाते. एखादा जनावर रस्त्यावर जर घायाळ अवस्थेत असेल तर तेथील लोकं म्हणा कि संस्था त्या घटनास्थळी पोहचून त्या जनावराचे प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न करतात. मनुष्याप्रमाणेच जनावरांसाठी तसे आपल्या देशात का बरं होत नाही. अस काही किंवा कधी होताना तुम्ही बघितले आहे काय ? मी तर कधीच बघितले नाही. आपल्या देशात अशी जनावर जर रस्त्यात मेली तर त्यांचा देहावरून अनेको वाहने जाऊन त्यांचा तेथेच चेंदामेंदा होतो. यावरून ही आणखी वाईट म्हणजे कुठल्या वाहनाने एखाद्या जनावराला धडक दिली आणि जर ते जनावर घायाळ झाले असेल तर त्या वाहनाचा चालक खाली उतरून त्या घायाळ जनावराला प्रेमाने नव्हे तर घाणेरड्या शिव्या देतो आणखी वरून त्याला दोन चार फटके मारून तेथून हाकलून लावतो. त्यावेळेस तो वाहन चालक याचाही विचार करत नाही कि माझा वाहनाने त्या जनावराला धडक लागल्यामुळे काही इजा झाली असेल त्यात माझी चूक आहे. म्हणून मी त्याला कुठे नेऊ शकत नाही तरी प्रेमाने त्या जनावराला रस्त्याचा दूर मैदानात नेऊन सोडावे जेणेकरून ते जनावर पुन्हा दुसऱ्या कुठल्याच वाहनाचा पुढे येणार नाही आणि असे काही त्याचा बरोबर पुन्हा घडणार नाही. त्यावेळेस मनुष्य ऐक अमानुषाप्रमाणे वागतो, आपली माणुसकी विसरतो. हे बिचारे जनावर त्यांची माणुसकी मरताक्षणी पर्यंत जपून ठेवतात तर आपण मनुष्य का बरं आपली माणुसकी विसरतो.
त्या जनावरांना मारतांना ते वाहन चालक म्हणतात त्या प्राण्याची चूक असते. १०१% चूक आहे, यात आपण मनुष्याचीच चूक आहे आणि असते. अहो ते जनावर आहेत, देवाने त्यांना तसे बनविलेले आहे. त्यांना मनुष्या सारखी बुद्धी नाही दिलेली आहे. देवाने त्यांना मात्र दिलेली आहे ती म्हणजे समजूतदार पणानं प्रेम करणे आणि कुठलाही तो पशु असोत किंवा मनुष्य त्याला आपलेसे करण्याची वृत्ती. मनुष्य फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतो. मनुष्याला जेंव्हा त्यांचापासून काही पाहिजे असते, तेंव्हा तो त्यांना आपल्या घरी आणतो. जे त्याला पाहिजे ते त्यांचाकडून घेतो आणि सोडून देतो रस्त्यावर भटकण्यासाठी तीकडे ते जगोत किंवा मरोत. आपल्या देशात असे पशु प्रेमी फारच कमी आहेत. १ ते २% जे या मुक्या जानावरांना सुद्धा आपल्या पोटचा लेकरांप्रमाणे प्रेम करतात, त्यांचावर आपला जीव लावतात. उरलेले फक्त आणि फक्त त्या म्हशीचा मालकाप्रमाणे असतात, जेंव्हा त्याला दुध काढायचे असते तेंव्हा तीला घरी आणून तिचे दुध काढले कि तीला रस्त्यावर मोकळे सोडून द्यायचे मरायला. आपण मनुष्यांवर ही स्वार्थी वृत्ती एवढी हावी होऊन गेलेली आहे, कि आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी स्वार्थ आणि फक्त स्वार्थच दिसतो. आपण याचा एवढे अधीन होऊन गेलेलो आहोत कि स्वार्था शिवाय आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास ही, मागे पुढे सरकण्यास ही विचार करतो तो आपल्या स्वार्थाचा. आपल्या मनातील निस्वार्थतेची भावना लोप पावलेली आहे. ती तर बिचारी एक म्हैस होती, परंतु आज एखाद्या मनुष्याचा अपघात झाला असेल तर त्याला मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात आणि स्टेट्स ठेवण्यात मग्न म्हणा कि व्यस्त असतो. मला त्या बिचाऱ्या जनावराचे ते निरागसपणे मान उचलून, पाय वर उचलून त्या निरागस डोळ्यांनी बघणे, तिची ती निरागस विनवणी करणे. जशी ती वारंवार म्हणत आहे, "अहो मला एक नजर तरी बघा हो, कुणीतरी माझी मदत करा हो " माझा हृदयाला, माझा मनाला सारखे निरंतर बोचते. रात्री झोपतांना आणि झोपल्यावर मला तोच क्षण सारखा आठवतो आणि माझ्या असमर्थतेची मला वारंवार जाणीव करून देतो.
तर मित्रांनो, माझा सोबत घटीत असा दुखदाई प्रसंग मी तुमचा पुढे बोलून माझे मन हलके केले. माझे कथन ऐकून जर कुणाला क्षणभर ही काही वेदना त्या निरागस जनावरांबद्दल वाटली असेल तर माझे कथन धन्य झाले असे समजेल. अन्यथा कुणाला हा प्रसंग व्यर्थ वाटतं असेल तर माझा लिखाणातील कमीपणा आहे असे समजून मी आपला निरोप घेतो.
धन्यवाद
गजेंद्र गोविंदराव कूडमाते

0 

Share


गजेंद्र गोविंदराव कुडमाते
Written by
गजेंद्र गोविंदराव कुडमाते

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad