Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग MCG
वंदना गवाणकर
25th Nov, 2022

Share

वीणा वर्ल्ड आणि कुठल्याही टूर कंपनी घ्या....ते तुम्हाला छळणारच...म्हणजे आम्ही शनिवारी सकाळी नऊला दादर वरून एअरपोर्ट, मग एक वाजता फ्लाईटने मलेशिया मग दुसर फ्लाईट ऑस्ट्रेलिया.... पुर्ण प्रवास झालं सतरा तास... ( आमच्या बरोबर सांगली सातारा इथून पणं प्रवास करून लोक आलेली ). थकतो नॉर्मल माणूस पणं तिथून परत त्यांच्या बस मधून अख्खी सिटी आणि एक दोन पॉइंट दाखवणार...त्यांचा दिवस नको वाया जायला आणि हॉटेल २-३ दुपारी... त्यानंतर मिळतं म्हणून आमची वाट लावतात.... डोळ्यात झोप, थकलेले शरीर, चहाची टपरी पणं नाही तिथे, एक कटींग घ्यायला आम्हाला कमीत कमी तीन ऑस्ट्रेलियन डॉलर मोजावे लागतात. एका डॉलर आहे ५५.७० पैसे समजा...मग झालं ना चहा १७० रुपयाला पोचतो... तो पणं दोन तीन घोट म्हणजे आपल्या भारतात कसा एक चहा त्याबरोबर एक रिकामा कप मग त्यात आपला चहा अर्धा ओतून एक एक सीप मला आणि नवऱ्याला.... दुसऱ्याला पण आनंद मिळवून देतो...तस नाही इथ. एक्स्ट्रा कप मागायचा कसा?... इज्जत का सवाल है भाई. इथ मला तुम्हाला एक जनरल गोष्ट सांगावीशी वाटते...प्रत्येक जण ठरवत असतं जायचं ना मग खर्च बघायचं नाही...पणं आपलं कॅल्क्युलेटर मन सतत हा विचार करतं असतं...( गणितात हुशार ना आपण सगळे लहानपणापासूनच...हातावर पट्ट्या मिळायच्या... बारा पंचे म्हटलं की झोपेत पणं साठ म्हणू ). तर तुम्ही कितीही शॉपिंग करांयची म्हटलं तरी हिशोबी मन तुम्हाला साथ देणारच... कारण आपण आपला पगार रुपयात कमावतो आणि ते लोक डॉलर मध्ये म्हणून... जास्तीत जास्त बाहेर खातात... तिकडे फळं खुप सुन्दर होती. हॉटेल मधल्या breakfast मध्ये ती कट करून ठेवतात... इतकी गोड आणि रसाळ चवीला.
आमच्या ग्रुप मध्ये अशी नविन लग्न झालेली दोन तीन जोडपी होति...मुली पणं नोकरी करणाऱ्या होत्या... काहिही घ्यायला गेले..की आम्हाला सांगायचे ' हे इंडिया मध्ये ना स्वस्त मिळतं '. झालं त्यात तो टूर गाईड ' कपडे आपल्या भारतातून ईथे येतात...हे तिथून येत... वैगरे सांगायचा... घेणारं तर फक्त बटर, चीझ हे घ्या ते इथलं छान असतं' अरे सद्गृहस्था...ते विरघळल किंवा लिक झालं तर त्याच्या दुप्पट पैसे सगळे कपडे धुवायला द्यावे लागतील....कळतच नाही.( ह्याचे कपडे ह्याची बायको धुवत असेल)
तर दुसऱ्या दिवशी आम्ही MCS मेलबर्न क्रिकेट स्टेडियम वर गेलो. प्रचंड मोठं....अगदी आपला सचिन कुठं बसायचा, विराट कोहली कुठं बसतो ( अनुष्का त्याला कुठून हात करते ते पणं बघितलं...(मला त्यातच इंटरेस्ट) बाकी पुरुषाचं वेगळंच होत...ही मॅच, ती मॅच, ह्याचे फोटो... वैगरे. ' सचिन सचिन ' करून एकसुरात चिअर अप केलं...आपण भारतीय असल्याचा आणि सचिन आपला असल्याचा फील दुसऱ्या देशात येणं....सॉल्लिड. आम्हाला तिकडे गेल्यावर अल्लेन नावाच्या तिकडच्या गाईडला भेटवले...६.५ फूट उंच, वय वर्ष फक्त ९०, दणदणीत तब्येत ( ब्रेड खाऊन)...आम्हाला सगळी माहिती देत होता...एक फरक जाणवला तो आम्हाला जिथं नेत होता आणि त्याचा एक मित्र दुसऱ्या गोऱ्या लोकांना पणं बाजूला फिरवत होता..आमची बडबड आणि फोटोग्राफी संपत नव्हती...आणि ते गोरे त्यांच्या गाईडला मन लावून ऐकत होते, शांतपणे, एखाद दुसरा फोटो ग्राउंड आणि स्टेडियमचा, की निघाले त्यांच्या पाठी. आम्ही खुर्चीवर बसून, खिडकीत राहून, इकडे वाकड होवून असे फोटो काढत होतो. ( जाने दो अपनी अपनी पसंद है) परत थोडेच येणार सारखे सारखे.
जेवायला फक्त इंडियन रेस्टॉरंट मध्ये न्यायचे..मग नॉर्मल जेवणं जे घरी खातो... डाळ भात, पनीर भाजी, सलाड, आणि मैद्याच्या रोट्या...आणि द्यायचे भरपूर पापड, गोड दही ( दह्याची चव काय अगदी आपले चितळे पणं झक मारतील) एकदम घट्ट दही साखर न घालता पणं गोड. (तिकडे डेअरी फार्म भरपूर आहेत पण म्हणून मिसळ कुठेच नाही. हिरवगार शेत आहेत सगळीकडे जिथं जर्सी गाईपासून आपल्या गाई पणं दिसत होत्या चरताना) नॉनव्हेज वाल्यांना एक चिकन डिश...सगळीकडे आम्हाला गुलाबजाम स्वीट डिश मिळाली...आता पुढचा एक दोन महिने गुलाबजाम बघणार नाही हे नक्की.
तिथं आम्हाला पेंग्विन परेड दाखवायला नेलं पॅसिफिक महासागरवर.. संध्याकाळी साडेआठ वाजता ते पेंग्विन येतात बाहेर. .त्यांनी सांगितलेले गरम कपडे घ्या...पणं केवढे?? ...मरू दे ते पेंग्विन हॉटेलवर जाऊया अस सगळ्यांचं म्हणणं...शेवटी तीनशे पेंग्विन परेडला दिसतात असं सांगितलेले,( सूर्यास्ताला ते पाण्यातून वर येऊन समुद्र किनाऱ्यावरून त्यांच्या घरी जातात...त्याला परेड म्हणतात...तिथे कॅमेरा मोबाईल pics घ्यायचे नाहीत...कारणं त्यांच्या फ्लॅश लाईटने बरेच पेंग्विन आंधळे झालेत. ) आम्हाला जेमतेम पाचच दिसले....त्यांना पणं ' हाय' न करता पळालो....कारणं तिकडे temperature झालेले किती सांगा...६ डिग्री. जाऊ न वरती डायरेक्ट देवाला ' हाय ' करायला.
जेवढे हॉल मधल्या टीव्ही वर दिसले तेवढे बघितले... समाधान... गपचूप गाडीत येऊन बसलो...त्या ड्रायव्हर ने हिटर ON केलेला म्हणून वाचलो....तो म्हणाला ' मला माहिती आहे तुम्ही भारतीय ह्या थंडीत नाही राहू शकतं जास्त वेळ बाहेर '. हुशार निघाला ( आमच्या संगतीचा परिणाम). हॉटेल वर रात्री पणं गरम पाण्याची आंघोळ केली थंडी जायला....
आमच्या ग्रुप मध्ये दोन श्याहत्त्तर वर्षाचे वृध्द दोन बाहत्तर वर्षाचे, दोन सदुसष्ट वर्षाचे असे सहा वृध्द होते...पणं चालायच्या बाबतीत कुठंही मागे नाहित.... थंडीत फक्त जरा जास्त कुडकुडत...मानलं पाहिजे त्यांचा उत्साह. अश्याच त्यांच्या भरपूर ट्रिप होवोत हीच सदिच्छा.
🙏 वंदना ❤️

223 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad