Bluepad | Bluepad
Bluepad
अंबे है तु मा जगदंबे हैं तु माता.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
25th Nov, 2022

Share

भारतीय संस्कृतीत स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे . स्त्री ही घराची शान आहे . स्त्रीला लक्ष्मीची उपमा दिली आहे . स्त्री ही पहीली माता गुरू मुलांसाठी जग आहे . पुर्ण संसार हा स्त्रीशक्तीचा प्रतीक आहे . लहान सहान कोणतेही काम असो जे बुध्दिमान माणसाला सुचत नाही . असे फार महत्त्वपूर्ण कार्य स्त्रीचं करू शकते . म्हणुनच ती श्रेष्ठ आहे . स्त्रीशक्ती चा अनादर म्हणजे घराचं पावित्र्य नष्ट करणे होय . म्हणुनच ती कुटुंबाची प्रथम गुरू आहे . कोणतेही काम असो ती सहजतेने करण्याची क्षमता कौशल्य स्त्री मध्ये असते . उदाहरणार्थ शर्ट ची बटण तुटली आहे तर बटण लावणे , पायात रुतलेला काटा आत्मविश्वासाने काढण्याचे कसब स्त्री मध्येच आहे माणसाचा तुटलेला आत्मविश्वास जर कोणी जोडण्याचा काम कोणी करत असेल तर स्त्रीच आहे . विविध कामातील कौशल्य सुंदरता , अन्नाला चव येत असेल तर स्त्रीमुळेच . ऐकायला कटु वाटत असलं तर उच्च जगातील जास्तीत जास्त घर कुटुंब सुरक्षीत ठेवण्याचे संस्कार कोणात असेल तर ते स्त्रीमधेच . जगातील जास्तीत जास्त घर बर्बाद होण्यापासून वाचले असेल तर ते स्त्रीमुळेच नाहीतर जगातील अर्धै कुटुंब संपुष्टात येतील . जगात अनेक नातं अनेक संबंध असेल परंतु आई , पत्नी , बहीण चे जे प्रेम आहे ते कोणीच करु शकत नाही . कोणी कितीही जवळचे असले तरी स्त्री नात्याची बरोबरी सुरक्षा कोणीच करु शकत नाही. मनाला ओळखणारी आई आणि नशीबाचा भविष्याला ओळखणारा बाप हेच या जगातले सर्व श्रेष्ठ ज्योतीषी आहेत .आपल्या कुटुंबाला धन धान्य समृध्दी वैभवशाली संस्कृती लाभावी यासाठी पुजा पाठ व्रत वैकल्ये उपवास ला न्याय कोणी देत असेल तर ती स्त्रीचं . प्रेमाने जग जिंकण्याचे सामर्थ्य तसे उच्च रागात रणरागिणी चार अवतार माता दुर्गा माता . राक्षसी प्रवृत्तींना संपविणारी माता स्त्रीचं होती . मुलांच्या सुरेक्षेसाठी मातृत्व पनाला लावणारी धावणारी माता स्त्रीमध्येच दडलेली असते ... जगात सर्वात सुखी कोण या प्रश्नाचे उत्तर एक गरीब आईचं सांगु शकते ज्याला दोन वेळची भाकरी खायला मिळते आणि जमिनीवर पडल्या बरोबर सुखाची शांत झोप लागते . यापैकी दुसरा सुखी कोणी असु शकत नाही . सर्व सुख पैशांनी ‌विकत घेता आलं असतं तर जगातील सारेच श्रीमंत माणसे सुखी असती परंतु बरेच जणांना झोपच येत नाही . ‌एकदा झोप न येणारी पाच पंचवीस माणसं झोप येणार्या माणसाच्या शोधात निघाली त्यात प्राध्यापक डाक्टर वकील शिक्षक नेते पुढारी अधिकारी अभियंता कर्मचारी व्यावसायीक असे सारेच होते . परंतू यांना झोप येत नव्हती . त्यांना झोप येणारा माणूस भेटला तो शेतात काम करणारा शेतमजूर . मेहनत केला , बैल बांधले हातपाय धुतले शिदोरी काढली चटणी भाकरी ‌खाल्ल आणि दोन मिनीटात मस्त झोपलाय . यावरून काही निष्कर्ष पुढे येतात ते असे , .... झाडांची पाने रोज गळतात परंतु त्याच हवेच नातं बदलत नाही . तोंडानी माफी मागणं आणि माफ करण सोप असतं परंतु मनातुन माफ करण्यासाठी पुर्ण आयुष्य पणाला लागतं . विचार न करता केलेलं कोणतेही काम व्यवसाय नोकरी पद अर्थहिन ठरू शकतात . अनर्थकारी होऊ शकतात . आपले प्रयत्न मेहनत स्वप्न अपेक्षा आशा अवश्य मोठी असावी परंतु आपल्या आवश्यकता कर्तव्य निश्चित असले पाहिजे . काही वेळा नदीच्या प्रवाहात सारंच काही वाहून निघुन जातो . परंतू काही धारा अशा असतात ते इतिहास रचतात . कधी आठवायचे असेल तर आयुष्यातले चांगले क्षण आठवा आणि हे विसरायचं असेल तर वाईट क्षण विसरावे ...क्षण हा असा शब्दप्रयोग आहे त्याचा अर्थ फार मोठा आहे . आयुष्यात सुख दुःख आनंद अनुभव येत जात असतात .. दुःखाचे क्षण जिवन जगण्यासाठी अनुभव मागे ठेवून जातात . तर आनंदाचे क्षण जगणं शिकवून जातात . काही क्षण असेही येतात आपल्या सभोवती सारेच असतात पण सोबत कोणीच नसतात . अशा वेळी आपणास हिम्मतीने समोर जायचं असतं . कधी वाटते भित्ती मनाला कधी मिळतो आनंद . जिवनाचा आयुष्याचा जगण्याचा हा खेळ सुरु असतो सारा . बेसावधपणे मिळालेले सुखाचे क्षण असो किंवा दुःखाचे धक्के शिकवितात आयुष्य जगायला . आणि माणसं ओळखायला . म्हणुनच क्षण ठेवा आनंदाचे साठवुन जे जगण्यास बळ देतील हे. हीच आमच्या मातेची शिकवणं . हाच स्त्रीशक्तीचा उध्दार . मी जन्म दिला कुणाला तर सज्जन पुरूषार्थ माणसाला . अंबे है तु मा..
जगदंबे हैं तु माता....
🙏🏻🌹🙏🏻

165 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad