Bluepad | Bluepad
Bluepad
समाजसेवक गजानन हरणे यांचा पत्नीचा आगळावेगळा देशातील पहिला उपक्रम
Gajanan Harne
Gajanan Harne
24th Nov, 2022

Share

सेवाश्री जनरल व डेलिनीडस चा विधवा ज्येष्ठ महिलांच्या शुभहस्ते शुभारंभ..............🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. अकोला.............................. स्थानिक जि प नगर खडकी बु. अकोला येथे सेवाश्री जनरल व डेली नीडस चे उद्घाटन अमावस्येच्या दिवशी ज्या दिवशी कोणीही कोणत्याहो प्रकारचे शुभ कार्य करत नाही अशा दिवशी ज्या विधवा महिलांना पूजा पाठ करण्याचे किंवा सार्वजनिक समारंभात दूर ठेवल्या जाते .घर , समाज परिवाराकडून दुर्लक्षित केले जाते . व त्यांच्या हस्ते कोणतेही शुभकार्य करू नये अशी जी जुनी रुढी परंपरा अंधश्रद्धा आहे .तिला तीलाजली देऊन अशा "आठ आन घाट" म्हण खोटी ठरवून 'आठ 'विधवा ज्येष्ठ महिलांच्या शुभहस्ते " तीन तेरा अन काम बिघाड" अशा दुपारच्या 'तीन 'वाजता प्रतिष्ठानचे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते करून एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या संचालिका सौ यूगेश्वरी गजानन हरणे यांनी केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विधवा जेष्ठ महिला माननीय श्रीमती मंगला देशमुख, उषा लडवाणे, पुष्पा सायरे, चंद्रकला अंबाडकर, लक्ष्मीबाई बचे ,रेखा पोटे, विमलाबाई पोळकट , जयश्री देशमुख यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हराअर्पण करण्यात आले. त्यानंतर दुकानाचे उद्घाटन या महिलां मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन यशस्वी उद्योजिका वर्षा डाखोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या संचालिका यूगेश्वरी हरणे यांनी केले. कार्यक्रमाला खडकी परिसरातील महिला ,तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा प्रतिष्ठान दिल्या. चहापान फराळा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...🙏🙏🙏🙏🙏🙏. माननीय संपादक साहेब,. प्रकाशनार्थ.
समाजसेवक गजानन हरणे यांचा पत्नीचा आगळावेगळा देशातील पहिला उपक्रम

224 

Share


Gajanan Harne
Written by
Gajanan Harne

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad