Bluepad | Bluepad
Bluepad
जगणं.
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
24th Nov, 2022

Share

नाही कळत कस वागायचं !
निस्वार्थीपणे जगावं म्हंटल तर शक्यच नाही.
सत्य , स्वछ मनाने जगणं आता कठीण होऊन बसलंय.
खोटेपणाचा "आव " आणून नाही जगता येत मला.
उगाचच आविर्भावात जगुण , कोणा - कोणाला सूख देत बसू मी.
अजुन किती जणांना खोटं स्मितहास्य देऊ.
प्रत्येकाला आप- आपली पोळी भाजावीशी वाटते. त्यांना भीती वाटते माझ्यासारख्या लोकांची.
सत्याच्या वाटेवर काट्यांची माळ अंथरायची असेल तर ते कुटनीतीने काहीही करतील.
स्वतः च अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः जगावं लागेल. स्वतःचं विश्व निर्माण करावं लागेल. उगाचच ह्या मायाजालात अडकण्यापेक्षा "कुटुंब आणि मी" च बरा .
दुसऱ्याची भांडी धूत बसण्याची वेळ आता नाही राहिली.
भूतकाळात पाहिलं तर कोणासाठी स्वप्न बघितली , त्यांच्यासाठी ज्यांना तुमच्या वर्तमानात , भविष्यात काय चाललंय ह्याच काही देणंघेणं नाही. तुमच्या भूतकाळात तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न केलेत. हे सर्व ते विसरून गेलेत.
वीसरभोळेच आहेत ते....
वैयक्तिक आयुष्यात देणं- घेणं नसत.
सामाजिक आयुष्यात तुमचे मालक सर्वच असतात.
साधेपणाने राहिलात तर तुमचा वापर होतो.
स्पष्टपणे वागलात तर तुम्ही फटकळ असता , त्यांचा अपमान होतो.
निरागस राहिलात तर ते तुमचा रक्त पीतील.
सरळ राहिलात तर तुम्हाला नाहक त्रास देत राहतील.
रडत बसलात तर सहानुभूती च्या जागी आपले पापड भाजून घेतील.
गप्प राहिलात तर ऐकवत बसतील.
मग ठरवा तुम्ही असे कसे आयुष्य व्यतिथ कराल.
ब्रेन हॅंमरिंग करून तुमच्या विचाराना सतत पेटवत ठेवतील..
दूषित करत बसतील.
एकमेकांच्या बद्दल द्वेष निर्माण करतील.
मग तुम्ही सांगा मी कसं जगू ...ह्या कळयुगात अशे महारथी जन्मास आलेत ते कधीच कोणाचेही होऊ शकत नाही.
मग मी ही ठरवलं . मोजकेच राहायचं ! अलिप्त राहायचं!
स्वप्नाळू ✒️🔥

171 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad