Bluepad | Bluepad
Bluepad
असेही एकदा व्हावे...!
शंतनु जाधव.
शंतनु जाधव.
24th Nov, 2022

Share

पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याने साथ द्यावी...
हरवलेल्या सुखाला एकदा तरी हाक द्यावी...
तसे, आयुष्यात नसतेच काही योजलेले, पण,
गणित नियतीचेही मांडता यावे, असेही एकदा व्हावे...!
कोढयात गुंतलेल्या आयुष्याला, एकदा तरी सोडवावं.
पाने पलटतात जशी पुस्तकांशी,
तसं ते कोडंही सुटत जावं...
एखादा 'करार' आयुष्याचाही असावा...
असेही एकदा व्हावे ...!
क्षितीजाची ओढ कितीही असली,
तरी त्याकडे जाण्याचा, मार्ग हयात नाही...
असेलही... ज्याच्या भोवती, आभाळ चांदण्यांचे,
मात्र, त्या चंद्रास कुणी जिवलग नाही...
पण, कधीतरी त्या क्षितीजासारखे मृगजळही, आपल्या हातात यावे,
असेही एकदा व्हावे...
घेतांना शोध, अबोध तत्वाचा,शाश्वत सत्याचा,
भरकटलो जरी. तरी अनुभव गाठीशी यावा,
असेही एकदा व्हावे.... असेही एकदा व्हावे..!
@ Shantanu Nilkanth Jadhav.

183 

Share


शंतनु जाधव.
Written by
शंतनु जाधव.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad