Bluepad | Bluepad
Bluepad
तृप्त, अतृप्त अत्मा......!
shree
shree
24th Nov, 2022

Share

एक तर मनसोक्त भोगत जगावं किंवा सगळं त्यागत जगाव, पण या दोन्ही गोष्टीच्या आतलं द्विदा अवस्थेतल जगणं म्हणजे केवळ जळत जळत आयुष्या भोवती राख उधळत राहणं हेच आहे....!
अखंड ब्रह्मचारी राहणार्‍याचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला,, बळजबरीने संसार लादुन, संसार खुखाची गोडी लाऊन जर त्याच्या वाटलेला स्त्री देहाचा अर्धवट मिळालेला सहवास, स्पर्श म्हणजे
संन्यासी अत्म्याला अखंड आयुष्यभर त्या पाण्यातल्या माश्या प्रमाणे तडपत ठेवण्याचा जणू शापच मिळालेला असावा.. कधी कधी नियाती इतकी क्रुर वागते कि, तेव्हा आयुष्याला वणवा पेटावा वाटतो, आणि सगळं उध्वस्त होऊन जाव वाटतं....
जिवनाचा खार आनंद लहानपणी ज्ञानेश्वरी वाचुनच कळाला होता देवा यापलिकडे सुखाची आणि जगण्याची काही व्याख्या नाही, पण माणसाचा जन्म नात्याभवती झाला म्हणून, आदर्शवादी जगण्याने आई वडीलांचा प्रत्येक शब्द प्रामाणिक पाळला....
आणि वाटयाला आलं तोंड दाबून बुक्या सहन कराव्यात इतक्या यातना दुःख ही असला की या समाजात व्यक्त करायला मला माणसातला माणुसं शोधवा लागला तो ही मना सारखा मिळाला नाही, जिथं आपल्या आतलं दुःख मांडायला लायक व्यक्ती न मिळणं म्हणजे याहु सगळ्यात जास्त दुःख कोणतं असाव..
त्यातल्या त्यात, मर्द को दर्द होता नही. म्हणून या समाजाने पुरूषांचे रडण्याचे आधिकारच काढून घेतलेत कि काय हेच वाटतं
एकाटा होतो तेव्हा केवळ देव आणि शोध या आध्यात्मिक यात्रेत ना कुठली वासना होती, ना कसली अपेक्षा होती. ना कुण्या व्यक्ती सहवासाची गरज होती "परमानंद" केवळ भक्तीततं रमाम होऊन वृंदावन च्या नगरीत आपल्या आतल्या बासरूचा सुरू शोधत कृष्णमय भक्तीत लिन होऊन जगणं हेच होत...
प्रेम कुणाला करावसं वाटतं नाही, पण मला प्रेम करणाऱ्या आधी प्रेम समजून घ्याच होत म्हणुन माझ पहिलं प्रेम ईश्वर आणि निसर्गावर होतं आणि त्यात नंतर कुठे तरी मनात
"एका अनामिक प्रियसी चित्र निर्माण झाल होत, तिच्या रूपात, दिसण्याच चित्र मनात रेखाटत होत, ती तशी असेल..ति तशी असेल थोडक्यात आध्यात्मिक, साहित्यिक, थोडी फिल्मी, नटख अशी प्रयशीचा आपली सखी असेल आणि याचा शोध या कवी म्हणाला पडु लागताच......
मध्येच संस्कारत कुटुंब प्रमुखाने प्राण जरी मागीतला तर तो आनंदात समोर देऊन टाकावा इतक्या अज्ञेच पालण करणार्‍या देहाला अचानक संपूर्ण आयुष्यतील क्षणाला केवळ एका चुकीच्या गोष्टी मुळे कलाटणी मिळावी आणि संपूर्ण आयुष्यची राखरांगोळी व्हावी आणि जिवंत पणी जिवनाला मृत्यू छळण्याचा जनू श्रापच विधात्याने जिवनाला दिलेला असावा...
मन नसताना, प्रेम नसताना देखील एखाद्याशी केलेला विवाह म्हणजे केवळ करार आहे, आणि याची दखल खुद्द ज्यांनी जिवन दिल त्यांच्या समोर मांडुन देखील त्यांनी केवळ मंडपात बसण्याचा आशिर्वाद द्याव तेव्हा या जगात आता आपल कोणी तर होतं ही भावनाच त्या दिवशी मृत झाली...
डोळ्यात आनंद नाही, ह्दयात गंध नाही, जिच्यासाठी भर मंडपात गुडघ्यावर टेकुन कवीता म्हणावी असी कुठली फिलिंग नाही, जिच्या साठी, प्रेम पत्र लिहावे लग्नात तिच्या साडी मेंदीचा देखिल निवड एकसात मीच करावी, विवाह सोहळ्याचा सोहळा प्रेम करून दाखवून विवाह पार पडावा या सगळ्या स्वप्नांना
कुण्या दुसर्‍या सोबत बोहल्यावर चढताना लग्नातील मंत्र सुध्दा श्रापच वाटु लागले आणि जेव्हा धाडस करुन बहुल्यावर चढण्या आधी त्या अनोळखी निरागस साथीला आपल्या ह्दयाच्या येताना सांगितल्या वर हे कळालं कि ज्याला समज या शब्दाची ओळखच नाही त्या व्यक्ती समोर आपण आपली गाथा मांडली जो आपला साथी होणार आहे या दुसर्‍या दुःखाने आयुष्यात खरा वनवा पेटला..
त्यातल्या सगळ्या गोष्टी संयमाने आपल्या संस्काराची जानी हे करून देत होती व्यक्ती जरी वेगळा असला तरी अत्मा पवित्र आहे स्वप्न जरी भंग झाले असले तरी ते कुण्या नव्या जबाबदारीने पहावेत ही समज देऊन पुन्हा आयुष्याला रंगवण्याचा डाव सुरू केला त्यात विडा लागलेल्या महलात आपल्यातल्या सगळ्यात रोमॅन्टिक कवीच्या आत सगरा सारखं बळ सळसळावं आणि स्वताला आनंदात स्पर्शात कुणाच्या मिठीत अख्खं आयुष्य लूटुन द्याव या हळव्या भावनेला इतकी मोठी जख्म भेटायला येणार होती याची कल्पना देखील केली नव्हती....
दुसर्‍या दिवशी नवा सहवास आहे वेळ लागतो वाटलं पन आज असंख्य दिवस लोटले गेलेत जो गंध, जो शोध, जी तृप्ती मिळायला पाहिजे जो खरा आनंद जो समाधी कडे जाईल जो स्पर्श जो अत्मिक सुखात, बुध्दीच्या चैतन्य पटलावर गुलाबी फुंकणार मारून रात्र रात्र प्रेम साधनेत ध्यानस्थ होईल या सोहळ्यात या विधित होईल वाटलं पण,,,
ज्याला वासनाच नाही, गंध नाही गोर्‍यापान लाल सर देहाच्या आत रोमान्स नाही कामुकतेचा दुर दुर प्रयत्न गंद नाही असा निष्क्रिय असलेला गोरापान देह आपल्या वाटलेला याव जस भुकेने व्याकूळ सिंहाच्या तोंडाला रगत लागावे आणि जंगलात धावा टाकत फिरावे त्या सिंहाची आणि माझी सारखीच दशा झालेली असावी...
फरक इतकाच शशरीर सुख.हा शरीराचा लैंगिक तृप्ती नाही ती अखंड चालणारी दिर्घ साधना ती प्रेमाची सुक्ष्म आणि सखोल शोधाच्या आनंद यात्रेत आरग्याझच्या सगळ्या सिमा पार करून दो देहाचा एकसात एकात झालेली साधना आहे ज्यात आध्यात्मिक रित्या रोमॅन्टिक रित्या उतरुन समाधी अवस्था प्राप्त होणारी सगळ्या मोठी साधना आहे...
जिथे तंत्र विद्या आणि धर्म विद्या योग विद्या या सगळ्या मार्गावर वरून देहाला अत्म्याला शोधत एकमेकांच्या आत उतरू संभोग से समाधी साठी लागलेली साधना म्हणजेच सुखं... पण या सगळ्या मार्गाची जाणिव असलेल्या, सगळ्या सिमा पार करून चैतन्य जवळ सरवैच्य समाधी गाठण्याची ज्याची क्षमता असावी त्या देहाच्या वाटेल हे दुखः याव ही प्रतिक्षा मिळावी ही अतृपती मिळावी कि केवळ या अगणित जळत जळत रोज मराव हाच श्राम नियतिने दिलेला असावा...

185 

Share


shree
Written by
shree

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad