Bluepad | Bluepad
Bluepad
किमयागार -किमयागाराच्या तंबूत
Girish Shrikhande
Girish Shrikhande
24th Nov, 2022

Share

तरुण म्हणाला, आता तुम्ही मला काही सांगणार आहात का?. किमयागार म्हणाला 'नाही' तुला जेवढी माहिती पाहिजे तेवढी तुला आहे. मी तुला खजिन्याची दिशा सांगणार आहे. तरुण म्हणाला पण युद्ध चालू आहे ना?. किमयागार म्हणाला, वाळवंटात काय चालले आहे ते मला माहिती असते.
तरुण म्हणाला, मला आत्ता तरी खजिना सापडला आहे असेच वाटते. माझ्याकडे उंट आहेत, माझ्याकडे क्रिस्टल दुकानात मिळवलेले पैसे आहेत आणि पन्नास सोन्याची नाणी आहेत. माझ्या देशात तर मी श्रीमंत माणूस समजला जाईन.‌ किमयागार म्हणाला पण यातले काही पिरॅमिड मुळे मिळालेले नाही. तरुण म्हणाला, मला फातिमा मिळाली आहे ती पण एखाद्या खजिन्यासारखीच आहे.
ते आता शांतपणे जेवण करत होते. किमयागाराने एक बाटली उघडली व त्यातील लाल पेय तरुणाच्या ग्लास मध्ये ओतले. तरुणाने आतापर्यंत चाखलेल्या वाईनमधील ही सर्वात छान वाईन होती. तरुण म्हणाला, इथे वाईनला बंदी आहे ना ?.
किमयागार म्हणाला, " माणसाच्या तोंडातून आत जाते ते वाईट नसते, तर माणसाच्या तोंडातून जे निघते ते वाईट असते ".
किमयागाराचे वागणे घाबरवणारे असले तरी, वाइन घेतल्यानंतर तरुण थोडा सावरला होता.
जेवण झाल्यावर ते दोघे बाहेर आले. शितल चांदणे पडले होते. किमयागार म्हणाला, तुला अजून वाईन घ्यायची असेल तर घे. मजा कर. किमयागाराच्या लक्षात आले होते की तरुण थोडा सावरला आहे.
तू युद्धाच्या तयारीत असलेल्या वीराप्रमाणे आज रात्री विश्रांती घे. तुझे हृदय सांगेल तेथे तुला खजिना सापडेल.

188 

Share


Girish Shrikhande
Written by
Girish Shrikhande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad