Bluepad | Bluepad
Bluepad
आठवण😊
Nidhi sanjay sabale
Nidhi sanjay sabale
24th Nov, 2022

Share

आठवण
आठवण आनंद देणारी
भेटण्यातील व्याकुळता वाढवणारी
जीवाला वेड लावणारी
आत्म्याला हाक देणारी
नात्यातील बंधन जोपासणारी
हृदयाला स्पर्श करणारी
सोबतचा संवाद न्याहाळणारी
विश्वास टिकवून ठेवणारी
सहवासाला सोबत नेणारी
एकांतात स्मरण होणारी
आयुष्यात बहर आणणारी
जीवन जगायला शिकवणारी
चंद्राच्या प्रकाशात रमणारी
वेगळेपण दूर लोटणारी
मनातील भावनांना सावरणारी
जगाचे भान हरवणारी
स्नेहाच्या धाग्यांना जोडणारी
नव्या उमेदीला जागवणारी
नात्यातील प्रेमाला फुलवणारी
आठवण शब्दाचा मर्म कळणारी
निधी😊

172 

Share


Nidhi sanjay sabale
Written by
Nidhi sanjay sabale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad