Bluepad | Bluepad
Bluepad
लेख
N
Nandkishor Dhekane
24th Nov, 2022

Share

🙏🙏 भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवताआले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन आनंद आणि समाधान उसळी मारते.
ज्यांना हे प्रत्येकक्षात उतरवता आले ती भावंडे आणि त्यांना जन्म देणारे आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत.
पोटचे आले की पाठच्याचा विसर पडतो आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची परवड सुरू होते.
असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. याचे कारण आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे, संवाद संपला आहे.
आपले दु:ख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूगण बनू लागला आहे.
याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे. आणि...
मी काय मिळवले ?याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असेल काय आणि छोटे असेल काय त्याचे मुल्य समान आहे. आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भांवंडानाही वेळ दिला पाहिजे.
स्वतःला प्रश्न विचारून पहा ?
कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही. मन सुन्न झाल्याशिवाय रहणार नाही.
खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण
चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे ,हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ आजही तसेच आहेत फक्त आपला भाव आणि स्वभाव बदलला.
वय कितीही होऊ द्यात.
थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे
🎋आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे
🎋आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे.
👆हे शक्य आहे त्यासाठी वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडानी एकमेकांसाठी द्या.
त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन,एक दिवसाची सहल आयोजित करा,
कुवत असेल त्याने सर्व खर्च करा,
कुवत नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व भावंडे आईवडिलांसोबत रहा आणि अनुभव घेऊन पहा.हा अनुभव आणि आईवडील व भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही. या गोष्टी पैसे देऊन हिससा घेऊन वाटणी करून कोणालाही मिळवता येणार नाहीत.
हेच रामराज्य आहे आणि असे घर आजही अयोध्या आहे
🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹
लोभ असावा
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

170 

Share


N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad