Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - ऑस्ट्रेलिया टूर
वंदना गवाणकर
24th Nov, 2022

Share

ब्लॉग २६४- ऑस्ट्रेलिया टूर
चार वर्षांनी (मधली काही वर्ष करोना मध्ये गेल्यावर बाहेर जायचं प्लॅन केलं... ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर मेलबर्न क्रिकेट स्टेडियम बघायचं... हे माझ्या लेकाच आणि नवऱ्याच स्वप्न पुर्ण होणार म्हणून दोघे खूष. वीणा वर्ल्ड तर्फे बुकिंग केलं पणं कॉस्ट कटिंग मध्ये dryfruit पाकीट, बॅग्स, कॅप, रेनकोट सगळंच रद्द केलं. आपणच आपलं घ्यायचं मगं चकली, चिवडा, शेव घेतलं आणि निघालो. (दिवाळीचं नाही... नाविन बनवलं बर का).
पहीले मेलबर्नला पोचलो, एअरपोर्ट चेकिंग वैगरे काही नाही, आपल्यावर विश्वास हा त्यांचा धर्म.... आम्हाला बरच वाटलं... आधीच सूचना भरपुर असतात हे नको ते नका घेऊ...त्यात चेकिंग नाही म्हटल्यावर सुटका....इकडून बिया, फळ, dryfruit naahi न्यायचे हे कळलेलं. मेलबर्नला पॅसिफिक महासागर जवळच असल्यामुळे थंडीची लाट जबरदस्त...म्हणजे १२ temperature ला पणं थंड हवा असल्यामुळे ते ८ झालेलं... त्यात पाऊस म्हणजे बोलाच आता. कानटोपी हातमोजे, स्वेटर, जॅकेट जीन्स घालून पणं आम्हाला कुठूनतरी उघडेच आहोत वाटतं होते, मग काय मास्क घातला नाकावर... तेवढी पणं हवा नको.
आपले भारतीय आईवडील मुलांकडे दोन तीन महिन्यांसाठी जातात...पणं का कंटाळतात ते कळलं... बाहेर पडण्याचं कामच नाहि. थंडगार वारा, बाहेर कोणी दिसतं नाही, मुलं नेतील तेंव्हाच बाहेर पडायचं.... तुम्हाला काही कळत नाही.... आपल्या भारतात दर दोन मिनिटाला एक प्रश्र्न असतो...काय? कसे आहात? जेवणं काय बनवलाय? भाज्या किती महाग झाल्यात ना? शेवटीं राजकारण्यांवर येऊन संपतो...एवढं बोलायला लागतं एका दिवसात...जे परदेशातील वास्तवाला अर्ध्याने पणं बोललं जात नाही, कसा पटणार त्यांना.
एकही खड्डा नसलेला पणं निर्मनुष्य रस्ता...सगळे गाड्याताच...रस्त्यावर भिकारी नाही...म्हणजे आम्हाला तरी नाही दिसले.... कदाचित् त्या गोऱ्या लोकांमध्ये मिसळून गेले असतील म्हणून कळलं नसेल...पणं कोणाच्या हातात खापराचा तुकडा नाही, अंगावर फाटकी वस्त्रे नाहीत....मग नाही दिसला... अगदी समुद्र किनारी पणं नाहीच.
ईथे माझ्या नवऱ्याचा ऑफिस मधला मित्र भेटायला आला.. तेरा वर्षे तो बायको मुलींना घेऊन ऑस्ट्रेलिया मध्ये राहतोय... गेली चार वर्षे गेलो नव्हतो भारतात कारोना मुळे...ह्या डिसेंबर मध्ये जाणार. मोठ्या मुलीला कॉलेज मधून दुसरं वर्ष संपता संपता तिथंच सरकारी नोकरी लागली...मग तिने ती स्वीकारली आणि शिक्षण पुर्ण होते तोपर्यंत पक्की झाली नोकरीत.. मग काय आम्ही आता इकडेच राहणार.. इकडे शिक्षण आणि नोकरी पटकन मिळते. भारतासारख नाही...असं त्यांच म्हणणं...पणं पुढच्या क्षणाला खरं ते ओठावर आले...' माणसं नाहीत... बोलायला...म्हणून तुम्हीं आलात तर बोलायला, भेटायला कोणीतरी भारतीय मिळाले ह्याचा आनंद म्हणून आम्ही ४०किलोमीटर अंतर कापून आलो, भरपूर गप्पा केल्या पोट भरून. ' इथल्या प्रत्येक भारतीयाला ह्याची उणीव जाणवत असेल...कारणं एक पासष्ट वर्षाचे डॉक्टर जोडपं आमच्या ग्रुप मधल्या त्यांच्या जून्या शेजाऱ्यांना न्यायला आलेले...'आम्ही ह्यांना लेट सोडू, इतक्या वर्षांच्या खुप गप्पा मारायचया आहेत' ..हे वाक्य. आम्ही भारत सोडून इथ आलो पणं तिथं आता आमचं कोणीही नाही जायला ( नाती जपलीच नाहित तर कोण असेल?)... कुठं जाणार? इथच शेवट...एक मुलगा अमेरिकेत शिफ्ट झाला, दुसरा मुलगा सिंगापूर....त्यांना आता आम्ही नकोत. आम्ही दोघाचं राहतो. प्रत्येकाची व्यथा आणि कथा वेगळी असते.
गोऱ्यांचा देश.... आम्हाला लहानपापासूनच गोऱ्या रंगाचं आकर्षण ना....इकडे एवढे बघितले की आकर्षण संपलं... नुसती गोरी चामडी.... निळे, घारे डोळे बास. त्यात तरतरीतपणा नाही अस जाणवलं ( कदाचित् मला सावळ्या लोकांचे फिचर्स आवडतात म्हणून असेल). एक प्रश्र्न पडलेला एवढ्या थंडीत पणं हे लोकं कमि कपड्यात कसे वावरतात? आम्हाला स्वेटर वर काहीतरी घालावसा वाटतं होते, इथ छोटे फ्रॉक.... ह्यांच्या शरीराला सवय झाली एवढ्या थंडीची....बापरे. जर का बर्फ पडला तर....आमच काय ? तेव्हा ते लोक स्वेटर घालतील वाटतं...
जावे त्यांच्या देशा... स्वच्छता...त्यांच्या हाताला लागलेली सवय... इकडची टॉयलेट एवढी साफ....कारणं कोणी कंप्लेंट केलीच तर त्यांना जबरदस्त फाईन भरावा लागतो... बोला... आपले मोदी फक्त टॉयलेट बांधायला सांगतात...साफ ठेवणं ठेकेदाराच्या हातात असतं...आणि ते परीक्षण करणं...देव जाणे कोणाच्या हातात असत...असे फाईन इथे भरावे लागले तर टॉयलेट बांधण बंद करतील.
रात्रि ८.३०-९ नंतर सगळं सूनसान...अगदी कोकणासारख.. शांत... चॉकलेटी कौलारू घरं सगळीकडेच त्यावर चिमण्या बांधलेल्या, छोटंसं हिरवगार लॉन...गाडी पार्किंग...सगळं आपणच मेन्टेन करायचं... नोकर परवडत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे इथ सर्व दुकानात board लावलेले..' करोना मध्ये गेलेले वर्कर्स परत आले नाहीत त्यामूळे तुम्हाला सेल्फ सर्व्हिस करावी लागेल '. सगळं आपणच करायचं..( आपल्याला सवय कूठे आहे...घरात करतो...परत बाहेर जाऊन पणं तेच) पण आमचा टूर गाईड आम्हाला सगळं हातात देतं होता... बरं वाटलं. आलिया भोगासी असावे सादर.... खाऊनिया आयते गुपचूप बसावे.
🙏 वंदना ❤️

233 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad