Bluepad | Bluepad
Bluepad
पाऊस आणि शाळेचा आठवणी
Mrs. Mangla Borkar
Mrs. Mangla Borkar
24th Nov, 2022

Share

पहिला पाऊस म्हणजे जणू काही नवीन आयुष्याला सुरवात झाली आहे
अस वाटायला लागतं ,
पत्र्यांवर पडणारे मोठ्या मोठया थेंबाच आवाज ऐकण्यासाठी कान तरसून गेले होते ,
का माहीत नाही पण पावसाळा नेहमी त्याच्या प्रेमात पाडतो जेव्हा कधी तो बरसत असतो ,
पडताना खूप साऱ्या आठवणी पण घेऊन येतो त्यातील काही सुखावणारे तर काही दुखावनारे असतात पण ठीक आहे यार..
शाळेत जाताना आलेला पहिला पाऊस आला की सुरू होतात त्या आठवणी ते दिवस बालपणीचे जास्त पाऊस पडला की मिळालेली सुट्टी ,शाळेत जातात घातलेला रेनकोट किंवा छत्री आणि मुद्दाम पावसात थोडं भिजायचं ,केस ओले करायचे.
मधली सुट्टी झाली की बाहेर पडताना एकाच छत्रीत आम्ही सगळे मित्र बाहेर पडायचो आणि एकमेकांना ढकलत बसायचो , पावसामुळे अभ्यासाकडे कोणाचेच लक्ष नसायचे ,सगळे लक्ष खडकीच्या बाहेर ,आणि आम्हाला अजून एक बहाणा मिळायचा वेळ घालवायचा ..
शाळा सुटली की चालू होईची ती खरी मजा ,जिथे जास्त पाणी साठलेल असायचं तिथे मित्रांना बोलून जोरात उड्या मारायच्या आणि त्यांना चिखलात माखून पळून जायचं ..
घरी आल्यावर आईचा मिळालेला ओरडा ऐकून शांतपणे कपडे बदलून बसायचं ..
कधी सुट्टी असली का बाहेर खेळायला जायचं, पपेराची बनवलेलं होडी वाहत्या पाण्यात सोडून शर्यत लावायची ,
खूप मजा यायची आणि आता तेच सगळं दिवस आठवून थोडं आंनद ही होतो आणि दुःख पण …
श्रीमती मंगला बोरकर

166 

Share


Mrs. Mangla Borkar
Written by
Mrs. Mangla Borkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad