Bluepad | Bluepad
Bluepad
निःस्वार्थ❤️ प्रेम
shree
shree
24th Nov, 2022

Share

" प्रेम "❤️
स्वार्थ आणि फायदा पहाणार्‍या जगात नाती कशी असावीत हे ठरवुन ठेवलं जात आहे, त्या जगात मी ह्दयातील आतल्या आवाजाच्या दिशेने जात आहे,
एकिकडे नाती केवळ चित्रपटातील रंजक गोष्टी किंवा मोहीत असणाऱ्या वस्तू, संपत्ती, पद यांचा मोह आपल्या आत जागा होऊन त्या वस्तू सुखा साठी एखाशी नात ठेवणं हीच जगाची व्यावहारिक रित झाली आहे,
या सगळ्या गोष्टीत निर्मळ भावनेचा बळी दिला जात आहे
व्यक्ती बुध्दीनेच सर्वकाळ जगण्याच्या धडपडीत आहे , केवळ ठेच लागीच तरचं आपल्याला भावना आणि ह्दय आहे याची त्याला पशु प्रमाणे जाण येत आहे..
पण जिथे देवाने ह्दय दिलं आहे, त्यालाच मारून केवळ शरीर भोगासाठी असंख्य वस्तूचा उपभोग घेत आयुष्यचा शेवट केवळ व्यापार म्हणून व्हावा, तर सरणावरती गेल्यावर आपन आपल्या ह्दयाला तरी कमीत कमी न्याय दिल का असा प्रश्न मयत शरीराला ह्दयाने केला तर संपूर्ण आयुष्य मृत्यू मुखीच जगलो हिच भवना असेल. ?
प्रेम ही केवळ शोभिवंत वस्तू नाय, किंवा प्रेम ही टिव्ही वरील नाटकी संगीताची धुन नाही.. रक्ताताची नाती आपली. वाटतात कारण त्यात आपलाच अंश आहे,,, मित्रांवर आपलं प्रेम आहे कारण निवड आवडीतुन सहवासातून केलेली निवड आहे मग या सगळ्या निःस्वार्थ प्रेम आहे तरी कुठे..? हा तर आपल्याच अंशाचा भाग आहे ज्या वर आधिच प्रेम जन्मलेलं असत यात निर्माण झालेल प्रेम कुठं आहे..
जेव्हा निःस्वार्थ मनाने ह्दयाचा शोध घ्यावा तेव्हा प्रेम ही अवस्था केवळ निःस्वार्थ प्रेमातच लपलेली आहे..
कुठे कधी, कशाचीही अपेक्षा न करता कधी कुणावर प्रेम केलय का?
अगदी रूप, रंग, पद, कपडे, ठाव ठिकाना.. नसताना कधी कोणता व्यक्ती आपल्या आत आत्मिक झालय का.?
इतकी अफाट शक्ती आपल्या आत निर्माण होऊन कधी कुणावर निःस्वार्थत प्रेम उळलय का? अगदी जिव मुठीत घेऊन वावरावं
. न जन्माची भिती,, ना मरणाची
केवळ आयुष्याची उधळपट्टी करावी तशी प्रेमाची उधळपट्टी केलिय का..?
ना, त्याच्या स्विकाराची अनुमती,, ना अस्विकारची अशा.. केवळ एक निर्मळ भावना, त्या व्यक्तीच्या प्रेम अवस्थेत कायम एकाच व्यक्तीसाठी आयुष्य भर प्रेम करत झूरत, आनंदात, एकांतात, मरण ही आल तरी ते हसतमुखाने स्विकार करून त्याला कवटाळने.... इतकं निःस्वार्थ प्रेम करत एकाच व्यकतीशी आयुष्य भर प्रेम करत प्रामाणिक राहत
त्याच्याच प्रतिक्षेत उभ राहणं म्हणजेच "" प्रेम""
शशि केंद्रे... 🤎

170 

Share


shree
Written by
shree

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad