Bluepad | Bluepad
Bluepad
लग्न
सौ.अश्विनी अमोल जोशी
सौ.अश्विनी अमोल जोशी
24th Nov, 2022

Share

लग्न एक जुगार म्हणलं तर
ते वावगं ठरणार नाही
भले गुण कितीही जुळू देत
स्वभाव काही जुळणार नाही
अनोळखी दोन माणसं अशी
कशी सुखानं नांदणार
अन् ओळखीचे असूनही दोघं
न भांडता कसे राहणार
वचनं होतात फेरे होतात
होतात सारी रस्मे
हातात हात धरून तेव्हा
घेतली जातात कस्मे
नव्याचे नऊ दिवस
तसे दिवस सरतात
कळतच नाही कोणालाच
कसे दिवस फिरतात
स्वभाव समजण्या आगोदरच
गरोदरपणा आलेला असतो
उलट्या मळमळ चक्कर यातून
तिला त्याच्यासाठी वेळच नसतो
नऊ महिने नऊ दिवसांनी
चित्र पूर्णच वेगळं असतं
दुपटी लंगोट डायपर यांनी
घर सारं भरलेलं असतं
मग येते वेळ एकदाची
आपलं शहाणपण निघण्याची
बाबांना काही कळतच नाही
हे वारंवार ऐकण्याची
पोरांच्या जडणघडणीत
यांचा पूर्ण वाटा असतो
बाप नावाचा माणूस तेव्हा
फक्त पैशांपुरता दिसतो
शाळा काॕलेज शिक्षण संपवून
पोरं आता सेटल होतात
पार्टी मैत्री धम्माल मस्ती
यात मायबाप मागे राहतात
कसबस शिक्षण संपवून
नोकरीसाठी गाव सुटतं
पोरं होतात लवकर प्रॕक्टीकल
आई बापाचं मात्र मन तुटतं
प्रगतीसाठी पोरांच्या मग
काळजावर दगड ठेवला जातो
पोर मागं वळून बघतच नाही
ह्यांचा वाटेकडे डोळा लागतो
घर होतं सुनं सुनं
मग जरा बातचित सुरू होते
रिकाम्या घरात परत एकदा
वादविवादांची लाट येते
आता मात्र विषय जरासे
अनुभवाचे अन् वेगळे असतात
शहाणपण जरासं आलेलं असतं
भांडण तंटे तिथं कुठेच नसतात
निसर्गाच्या चक्रातलं
हे शेवटचं चक्र असतं
म्हातारपणी नवरा बायकोला
एकमेकांशिवाय दुसरं कुणीच नसतं
*©®🖊️ अश्विनी कुलकर्णी/ जोशी,सोलापूर*

185 

Share


सौ.अश्विनी अमोल जोशी
Written by
सौ.अश्विनी अमोल जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad