Bluepad | Bluepad
Bluepad
स्वप्नसुंदरी
योगिता मिलिंद नाखरे
24th Nov, 2022

Share

रुप पौर्णिमा
स्निग्ध प्रकाश
स्वरगंधाचे धवलाकाश-
वर्ण केतकी
न्हाली पहाट
पहिली वहिली वळणवाट -
अथांग सागर
नयनांची घागर
हृदयी नित्य सतार -
हळव्या ओठी
हास्य मधुर
स्वप्नी अपुल्या चूर -
अशीच येते
स्वप्नसुंदरी
केव्हातरी अंधारी
पिसे लावूनी
क्षणात जाते दूर
घेऊनी माझे ऊर.
........योगिता मिलिंद नाखरे
स्वप्नसुंदरी

169 

Share


Written by
योगिता मिलिंद नाखरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad