Bluepad | Bluepad
Bluepad
मेघनाथ - रावणाचा पराक्रमी पुत्र
S
Shivani Patil
24th Nov, 2022

Share

मेघनाथ हा रावणाचा थोरला मुलगा होता. इंद्रांचा पराभव केल्यामुळे त्याला इंद्रजित म्हणूनही ओळखले जात असे. राम आणि रावण यांच्या लढ्यात त्याने प्रमुख भूमिका बजावली. ज्याच्याकडे त्रिमूर्ती(ब्रम्हा विष्णू आणि शिव) यांचे सर्वोच्च अस्त्र (ब्रम्हाचे ब्रम्हास्त्र, विष्णूचे वैष्णवास्त्र आणि शिवाचे पाशुपतास्त्र) होते. मेघनादाच्या पत्नीचे नाव सुलोचना होते.
मेघनादाने आपल्या तपश्र्चर्येने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रम्हदेवाने वर मागण्यास सांगितल्यावर त्याने अमरत्व मागितले पण ब्रम्हदेवाने हे स्रृष्टीच्या विरोधात आहे असे कारण देऊन वर देण्यास नकार दिला.पण वारंवार तेच वर मेघनाद मागत होता तेव्हा ब्रम्हदेवाने त्रास वर दिले की प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा जेव्हा तो आपल्या कुलदेवतेला एका गुप्त ठिकाणी यज्ञ अर्पित करेल तेव्हा तेव्हा त्या युद्धात तो अजेय राहिल,पण ज्या व्यक्ती द्वारे त्याच्या यज्ञाचा भंग होईल तोच त्याचा वध करेल व तो व्यक्ती असा असेल जो सलग १४ वर्षे झोपला नसेल.म्हणून त्याचा वध लक्ष्मणाने केला कारण प्रभू रामचंद्र व माता सीतेच्या सेवाकार्यात लक्ष्मण १४ वर्षे झोपला नव्हता.
मेघनादाने हनुमानाला बंदी बनवून रावणा समोर हजर केले होते.रावणाच्या पुत्रांमध्ये मेघनाद सर्वांत पराक्रमी होता. असे मानले जाते की, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याने मेघाच्या समान गर्जना केली होती म्हणून त्याचे नाव मेघनाद पडले. मेघनादाने युवा अवस्थेतच दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या सहाय्याने 'सप्त यज्ञ' केले होते आणि शंकराच्या आशीर्वादाने दिव्य रथ, दिव्यास्त्र आणि तामसी माया प्राप्त केली होती.
  त्याने रामाच्या सेनेशी मायावी युद्ध केले होते. कधी तो गायब होत असे तर कधी प्रकट होत असे. बिभीषणाने कुबेराच्या आज्ञेने श्वेत पर्वतावरून 'गुह्यक जल' आणून दिले होते. ज्याने डोळे धुतल्याने अदृश्य देखील दिसत असे. रामाच्या सर्व प्रमुख योद्ध्यांनी या जलाचा प्रयोग केला होता जेणेकरून मेघनाद दिसू शकेल आणि त्याच्याशी युद्ध करता येईल. लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात प्रलयंकारी युद्ध झाले. दोघेही एकमेकांवर दिव्य अस्त्रांचा प्रयोग करू लागले. दोघांचे युद्ध बघून आकाशातील देव सुद्धा हैराण झाले होते. तेवढ्यात लक्ष्मणाने रामाचे नाव घेऊन एक दिव्य बाण मेघनादावर सोडला. हा बाण मेघनादाचे मस्तक छाटून आकाशात दूरवर घेऊन गेला.

180 

Share


S
Written by
Shivani Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad