Bluepad | Bluepad
Bluepad
अपेक्षांचे ओझे
श्री गुंजन हरी देव
श्री गुंजन हरी देव
24th Nov, 2022

Share

हे हिरव्या चाफ्याच्या बियांचे गुच्छ आहेत. पिकल्यावर फळे पिवळसर होतात आणि खाली टपकतात. खूपच छान दिसतात.
माणसाच्या मनात सदोदित विचारचक्र सुरू असतेच. सहजच विचार आला इतकी सुंदर दिसणारी ही फळे खाण्यायोग्य असती तर किती मजा आली असती. माणसाच्या अपेक्षा न संपणाऱ्या आणि वाढत जाणाऱ्या असतात. ज्या हिरव्या चाफ्याचा सुगंध अतिशय अप्रतिम असतो त्याच्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आणि तृप्त व्हायचे. पण माणूस मात्र त्याच्या फळाकडून त्याच्यात नसलेल्या गुणांची अपेक्षा करत बसतो.
ज्याच्याकडे जे आहे त्याचा गौरव करायचा सोडून मनुष्य ज्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा करून स्वतःचा अपेक्षाभंग करून घेतो. यामुळे विनाकारण वातावरण गढूळ होते आणि तणाव वाढतो.
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधिम्।
अयोग्य: पुरुषो नास्ति योजक: तत्र दुर्लभ:।।
‘मंत्र म्हणून उपयोग नाही असे अक्षर नाही. औषधी गुण नाहीत असे मूळ (वनस्पती) नाही. कोणतीही व्यक्ती अयोग्य नसते. फक्त गरज असते ती योग्य अशा योजकाची (योग्य उपयोग करून घेणाऱ्याची).’
याशिवाय इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवणे हेच उत्तम. आपला दिवस आनंदात जावो.
श्री. गुंजन हरी देव.
सातारा

183 

Share


श्री गुंजन हरी देव
Written by
श्री गुंजन हरी देव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad