Bluepad | Bluepad
Bluepad
🌷 योगेशदादा साबळे एक आदर्श व्यक्ती🙏
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
24th Nov, 2022

Share

काल नानीबाई चीखलीला जात होतो त्यावेळी जाताना खडकेवाडा गावामध्ये गावातील सुरुवातीच्या वळणावरती मला एक अभिनंदनाचा डिजिटल फलक निदर्शनास आला. अगदी उत्सुकतेने थांबून मी तो फलक पहिला आणि अपेक्षेप्रमाणे तो फलक हा चिखली पंचक्रोशीत आणि कागल तालुक्यात सुपरिचित असणाऱ्या खडकेवाडा गावच्या सन्माननीय श्री.योगेश ज.साबळे यांचा होता.💐
सन्माननीय श्री.योगेश साबळे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो.योगेशदादांच्या बद्दल सांगायचं म्हटल तर बरच काही सांगता येईल.योगेश दादांनी "योगेश स्पोर्ट्स आणि योगेश फाऊंडेशन " मार्फत अनेक समजविधायक आणि प्रबोधनात्मक कामे केलेली आहेत.योगेशदादा हे योगेश स्पोर्ट्स व योगेश फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत.✍️
राजकारणाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांच्यासारखी व्यक्ती शोधून सापडायची नाही.कोणत्याही गटातर्फे न निवडणूक लढवता स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांच्या प्रेम आणि आशीर्वादावर त्यांनी गावच्या महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक अपक्ष लढवली आणि उत्कृष्ट मताधिक्याने ती जिंकली.आज योगेश दादा हे खडकेवाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत.🙏
राजकारणाबरोबर समाजकारणाचा सुद्धा ते अचूक समतोल साधण्यात निपुण आहेत.आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव वारंवार त्यांना आठवण करून देते.आपल्या देशाचं भवितव्य हे आजच्या युवक आणि युवतीवर अवलंबून असत हे सर्वश्रुत आहे,त्यामुळे योगेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलांच्यासाठी क्रिकेट सारख्या वेगवेगळ्या स्पर्धा ते भरवतात.त्याबरोबरच शाळेच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून योगेश फाऊंडेशनच्या माध्यमातून निबंध स्पर्धा,भाषण स्पर्धा अश्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.✍️
कोणत्याही व्यक्तीचं काही काम असेल तर त्यासाठी आपला वेळ देणं आणि त्या कामासाठी योग्य तो पाठपुरावा करणं याबाबतीत ते कदिही तडजोड करत नाहीत.माझा एक दोन तीन वेळा त्यांच्याशी संपर्क आला त्यावेळी मी त्यांना याविषयी चांगलं अनुभवलं आहे.एक व्यक्ती म्हणून त्यांचं समाजाप्रती चांगलं काम आहे.कधीही आपल्या पदाचा किंवा श्रीमंतीचा गर्व त्यांनी आजतागायत केला नाही किंबहुना त्यांच्या संस्कारात ते बसत नाही.🌷
गावात सर्वांच्या सोबत गोडीगुलाबीने संवाद साधणं, अपल्यामुळ कोण दुखावलं जाणार नाही याची विशेषकरून काळजी घेणं या गोष्टींचं पालन त्यांच्याकडून तंतोतंत केलं जातं.त्यांचा संयमी स्वभाव आणि मितभाषी वक्तव्य बरच काही सांगून जात.आज त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेवून राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित केलं कारण ते त्या पात्रतेला अगदी कौतुकास्पद योग्य आहेत.आज खरोखर त्यांना पुरस्कार देवून शासनाने एकप्रकारे जणतेतर्फे त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे.त्याबद्दल प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच चे खासकरून आभार.🙏
पुन्हा एकदा योगेशदादांचे मनापासून अभिनंदन.अजून त्यांच्याकडून असच समजसदुपयोगी वेगवेगळे उपक्रम ,योजना राबवल्या जाव्यात आणि आजच्या युवक वर्गाच्या विकासासाठी त्यांनी आपल्या फाऊंडेशन मार्फत अधिक भरीव काम करावं ही सदिच्छा.योगेशदादांना चागळे आरोग्य आणि भविष्यातील त्यांच्या कार्यासाठी बळ मिळावे ही आई अंबाबाईचा प्रार्थना...🙏
धन्यवाद...🙏
लेखन : श्री.दत्तात्रय के.पाटील,गलगले.
M - 7058098139.
🌷 योगेशदादा साबळे एक आदर्श व्यक्ती🙏

178 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad