Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
24th Nov, 2022

Share

शुभ गुरुवार .
क्रिकेट चं वारं वाहतं .
फुटबॉलचं वादळ असतं .
क्रिकेट आवडतं त्याला फुटबॉल आवडणं कठीण असतं . असं म्हणतात .
खरं ही वाटतं कधी ....
फुटबॉल चा धुसमुसळेपणा ,
क्रिकेट मध्ये क्वचितच दिसतो . स्टंम्प कॅमेरातून एखादी शिवी ऐकू येते . हावभावातून मात्र ती डिकोड करता येते .
फुटबॉल मध्ये तंगडी चा उपयोग दोन गोष्टींसाठी : बॉल ला नाहीतर विरूध्द बाजूच्या प्लेअर ला मारण्यासाठी .
क्रिकेट मध्ये सतत काहीतरी घडतं असतं . अगदी प्लेड करून रन नाही काढला असेल तरी , त्यात काव्य असतं .
सिक्सर मारल्यावर तर महाकाव्य .
क्लिन बोल्ड केलं तर ,
उसळतं गाणं आणि स्टम्पिंग केलं तर नाजूक गाणं .
फुटबॉल मध्ये नव्वद मिनिटांत सरासरी दोन गोल होणार . ते क्षण मात्र रोमांचकारी . एरवी पळणं आणि पळणं .
फुटबॉल मध्ये पाडणारा आणि पडणारा ही खूप वेळा खोटा ठरतो .
क्रिकेट मध्ये खोटेपणा अपवादात्मक . एखादा बॉल टॅम्परिंग चा प्रकार शतकात एकदा होतो .
क्रिकेट मध्ये कोच ही खेळाडूं सारखे कपडे परिधान करून असतात .
फुटबॉल मध्ये कोच सुटा बुटात तर खेळाडू मात्र अजागळ दिसणारे . केस वाढलेले . राकट दिसणारे .
प्रेक्षक ही वेगळे .
वर्ल्ड कप चा श्रीलंकेचा कलकत्ता येथील सामना न पुर्ण होता आपण हरलो होतो . तो प्रेक्षकांमुळे .
फुटबॉल मध्ये प्रेक्षकांच्या
मारामारी ची कायम धास्ती .
थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर ,
फुटबॉल म्हणजे शम्मी कपुर चं धुसमुसळतं गाणं .
क्रिकेट , देव आनंद चं तरलं गाणं .
हे ही खरं ,
शम्मी कपुर चं गाणं पाहायला कधी कधी आवडतं चं !
विश्वास बीडकर .
२४ नोव्हेंबर २०२२ .

168 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad