Bluepad | Bluepad
Bluepad
जिर्ण शाल...
Deepak Nalawade
Deepak Nalawade
24th Nov, 2022

Share

जिर्ण शाल...
झाला जेंव्हा माझा पहिला सत्कार
होतो मी तेंव्हा खूप लहान
बक्षीस म्हणून मिळाले मला
एक चॉकलेट 🍫 फाईव्ह स्टार
वय, शिक्षण वाढत गेले
अनुभव, ज्ञानात वाढ झाली
आईवडिलांचा आधार झालो
ईश्वराचे आभार मानून धन्य झालो
आयुष्य माझे मी जगत राहीलो
अनुभवाचे गाठोडे साठत गेले
पुण्यकर्म असेल मागील जन्माचे
जीवन माझे सुखसमृद्धीचे झाले
लग्न जमले, लग्न झाले
सुंदर स्वभावाची बायको मिळाली
माझी पहिली शाल, तिचा शालू
गांठ बांधली घट्ट जन्मोजन्मीची
नोकरी लागली, चांगले काम
अनेक वेळा झाला सत्कार
मिळाली पावती कामाची
हारतुरे,शाल आणी श्रीफळ
अखंड अविरत सेवेची पूर्ण केली
छत्तीस सदोतीस वर्ष
पुन्हा दिला प्रिय सवंगड्यांनी
शाल, श्रीफळ सह प्रेमाचा निरोप
सेवानिवृत्तीनंतर घर आणी दार
ज्याकडे झाले होते दुर्लक्ष
आता नवनवीन मित्र, नातवंडे
आनंदात व्यतीत होतात दिवस
ते ही होता होता दिवस सरले
काही मित्र, काही आप्तजन
सोडून चालले, आपले ते सर्वजण
दिवस काढणे आले एकांतात
मागे वळून पाहता पाहता
सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावर
पहिली ती शाल, घट्ट लग्नबंधनातली
हळुवार प्रेमाचा स्पर्श करुन गेली
सेवानिवृत्तीनंतरची मित्रप्रेमाची शाल
समोर पाहून कर्तव्याची जाणीव झाली
आता फक्त त्या आठवणीसह
जिर्ण शाल मग उरे शेवटी
जिर्ण शाल मग उरे शेवटी..
दिपक बजरंग नलावडे
१८/११/२०२२
9930183789

188 

Share


Deepak Nalawade
Written by
Deepak Nalawade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad