Bluepad | Bluepad
Bluepad
फसवणुकीपासून सावधान!!!!
दुर्गादेवी सरगर
दुर्गादेवी सरगर
23rd Nov, 2022

Share

फसवणुकीपासून सावधान!!!!
फसवणुकीपासून सावधान!!!!
कॉलेज मधून काही डाॅक्युमेंट्स घेण्यासाठी ती सकाळी लवकरच निघाली होती . तिचे काम झाले आणि तिने मला कॉल केला . आम्हा दोघीना विद्यापीठ मध्ये जायचे होते . तिने तिची गाडी स्टॅन्ड ला लावली आणि आम्ही बसने गेलो . आमचे काम झाले आणि आम्ही रिटर्न स्टॅन्ड ला आलो . आम्ही स्टॅन्ड च्या पाठीमागे गाडी लावली होती, तेथे गेलो तर तिथे त्या गेटला लॉक केले होते . म्हणून तिने तू इथे थांब !! मी गेट ची चावी घेऊन येते ,असे म्हणाली . मी तिथेच थांबले ,ती चावी आणण्यासाठी गेली . मी बराच वेळ थांबले आणि विचार आला, चावी घेऊन यायला इतका वेळ लागतो का ? फोन करणार ! इतक्यात तिचाच फोन आला. आणि तिने घडलेली हकिकत सांगायला चालू केले .
ते चावी द्यायला तयार नाहीत . मी लगेच..... का ?नाही देत. तिने त्यांच्या स्टाफ च्या पार्किंग मध्ये गाडी लावली होती . हे तिलाही माहित नव्हते . कारण तिने यापूर्वी कधीच त्या स्टॅन्ड ला गाडी लावली नव्हती आणि गरज पण लागली नाही . ती जेव्हा सकाळी गाडी पार्किंग करत होती, तेव्हा तिने गाडी लावायच्या आधी " पे पार्किंग कुठे आहे का?" शोधले होते . पण तिला कुठे दिसले नाही . एका ठिकाणी ,स्टाफ व्यतिरिक्त कोणीही गाडी लावू नये . अशी पाटी लावलेली वाचली. त्यामुळे तिने स्टॅन्ड च्या पाठीमागे जागा बघितली आणि तिथेच गाडी लावली . तेव्हा एका व्यक्तीने तिथे आत मध्ये गाडी लावा म्हणून सांगितले . तसेच तिथे कोणती पाटी हि लावलेली नव्हती . त्यामुळे तिने निश्चिन्त होऊन गाडी लावली . असे घडलेला सगळा वृत्तांत सांगितला .
पुढे म्हणाली ,ते मला त्याबद्दल शंभर रुपये दंड मागत आहेत. आणि ती त्यांना म्हणाली ,मी दंड देते आणि माझी चुकही मान्य करते . पण मी दिलेल्या दंडाची पावती मला पाहिजे . कारण हि पावती मिळाली कि, माझ्या चुकीची शिक्षा कायम लक्षात राहील. असे तिने त्यांना सांगितले . तेव्हा पावती काही मिळणार नाही असे त्यांनी तिला सांगितले . मग त्यांनी तिला भरपूर फसवण्याचा प्रयत्न केला . पण ती तिच्या मतावर ठाम होती . शेवटी ती त्यांना म्हणाली ,तुम्ही तुमच्या मुख्य साहेबांचा नंबर किंवा ट्राफिक पोलीस चा नंबर द्या . मी माझ्या चुकीबद्दल त्यांच्याशी बोलते आणि दंड देऊन पावती हि घेते . त्यावर ते फार चिडले ,तुम्ही आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करता का ?म्हणाले आणि तेथून निघून गेले. मग तेव्हा तिने मला कॉल केला . मी फोन ठेऊन ,थांब मी येते म्हणाले . तिच्याजवळ येऊन थांबले आणि म्हणाले ,तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे . तिला थोडा धीर आला .
हे सर्व घडताना एक व्यक्ती समोरून पाहत होती . त्यांनी स्मितहास्य देत विचारले ,काय झाले ?आम्ही घडलेली हकीकत त्यांना सांगितली. तेही थोडेफार त्यांच्या (बस मंडळाच्या )बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत होते . मला थोडा संशय आला कि, हि यांच्यातीलच व्यक्ती आहे. म्हणून मी मुद्दामच ,नाही चावी दिली तर आम्ही कुलूप तोडलं तर काय होईल ?असे म्हणाले . इतक्यात ती चिडून गेलेली व्यक्ती आली . ऑफिसमध्ये गेली आणि ज्या व्यक्तीने आमची चौकशी केली होती ,ती व्यक्तीही आत गेली . त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले माहित नाही . ती व्यक्ती आली आणि माझ्या हातामध्ये चावी देत ,"गाडी घेऊन पुन्हा मला आठवणीने चावी आणून द्या"असे म्हणाली. इतक्यात ज्या व्यक्तीने आमची चौकशी केलेली, त्या व्यक्तीने मुद्दामच त्यांना विचारले ,माझी गाडी घेऊ ना !!!! मग मला कळले ,हि स्टाफ मधील व्यक्ती आहे आणि ते हि चावीची वाट बघत थांबले होते. मी गेट उघडले ,तिने बाहेर गाडी काढली . तिच्या पाठोपाठ ,ते हि गाडी काढत गेटच्या बाहेर जात होते . इतक्यात मी त्यांना प्रश्न केला ,तुम्ही ड्राइव्हर कि कंडक्टर ?यावर ते म्हणाले, कंडक्टर !!! त्यांनी लगेच तुम्ही चावी देऊन येता कि, मी देऊ !!! असे विचारले . तुम्ही लॉक करा आणि चावी माझ्याकडे द्या असे मी म्हणाले. कारण गेट च्या आतून ऑफिस मध्ये चालत जाता येईल इतकी जागा होती . फिरून जाण्यापेक्षा शॉर्ट कट ने जाऊन त्यांना चावी परत केली आणि बजावून सांगितले ,"तुमची चावी दिली बघा". आणि तिथून निघून गेले मग आम्ही गाडीवरून आमच्या घरी परत आलो .
आम्ही त्या व्यक्तीचे म्हणणे मान्य करून शंभर रुपये देऊन आमची गाडी घेऊन जाऊ शकलो असतो. पण इथे विषय पैशाचा नाही तर तुमच्या कामातील प्रामाणिकपणेचा आहे. कदाचित ती व्यक्ती इतर चुकलेल्या व्यक्तींकडून ही असेच पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करू लागली असती. बरोबर आहे !जगात न चुकणारी अशी कोणतीही व्यक्ती नाही. पण आपण जी चूक केली ती मान्य करून त्याला दंड असेल तर देऊ शकतो .पण नसेल तर विनाकारण आपण त्या व्यक्तीला पैसे देऊन तिचा लालचीपणा वाढवण्यात मदत करू लागतो. बऱ्याच ठिकाणी आपण असे अनुभव घेत असतो, काही ठिकाणी आपण आपली काही कामे करून घेण्यासाठी गरज नसताना समोरच्या व्यक्तीला आगाऊ रक्कम देतो आणि तिच्याकडून काम पटकन होईल अशी अपेक्षा करतो. अशा गोष्टी कशामुळे घडत असतील, याची तुम्हाला कल्पना आहेच. घटना छोटी आहे पण विचार करायला लावणारी आहे. आपल्या समाजात फसवणार्या व्यक्तींची अजिबात कमी नाही. याबद्दल विचार करा, सावध राहा आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका.

190 

Share


दुर्गादेवी सरगर
Written by
दुर्गादेवी सरगर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad