Bluepad | Bluepad
Bluepad
समाजकी
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
23rd Nov, 2022

Share

... समाजकी .....
समाज समाज म्हणजे असतो तरी काय
पुढं जाणाऱ्याचं ओढत असतो पाय ...धृ
आपणाला जमत नाही
ते कुणाला करु द्यायच न्हाय
काढत बसायची गावाची मापं
दुसरं काम असतं तरी काय...१
वीतभर लाकूडं हातभर ढफळं
निंदा करण्या आयुष्य वाया जाय
मदत करायची दूरची गोष्ट
विरोधासाठी करी विरोधकास सहाय ...२
साम दाम दंड भेदांनी करती अपाय
गाढवापासून दूर राहणं चांगला उपाय
खाऊन नावं ठेवत सदा माघारी जाय
वासरात असते शहाणी लंगडी गाय ....३
..... कवि अटलविलास ...

239 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad