Bluepad | Bluepad
Bluepad
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन..
गिरिशिखर
23rd Nov, 2022

Share

जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन..
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांग शाळा तील विद्यार्थी व विद्यार्थिनी जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार स्पर्धा आयोजित केल्या जातात.
या स्पर्धांमध्ये मुकबधीर अस्थिव्यंग मतिमंद व अंध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो...
२५ मीटर धावणे,५० मीटर धावणे,२५ मीटर भरभर चालणे. एका पायाने अपंगत्व असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या एक कुबडी घेऊन
धावणे, स्पाट जंप,लगोरी, पोहणे,व्हिलचेअर रेस अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात..
सोबतच नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात..या स्पर्धां पाहण्याजोग्या असतात..
मुकबधीर मूले मुली ज्यांना बोलता येत नाही ऐकु पण येत नाही..ते विद्यार्थी बालीवुड हिंदी मराठी गितांवर अतीशय सुंदर नृत्य करताना दिसतात..
सेरेब्रल पाल्सी प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांना व्यवस्थित उभे राहता येत नाही असे विद्यार्थी बसुन छान नृत्य करताना दिसतात..
अध्ययन अक्षम विद्यार्थी पण छान नृत्य करताना दिसतात..
एकदा तरी दिव्यांग शाळाकडुन होत असलेल्या या कार्यक्रमाला अवश्य भेट द्या.
३ डिसेंबरला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुलात किंवा एखाद्या दिव्यांग शाळा परिसरात जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम आयोजित केला जातोच..
दिव्यांग शाळांतील कार्यशाळातील या कार्यक्रमाना एकदा तरी उपस्थिती दर्शवावी...

167 

Share


Written by
गिरिशिखर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad