Bluepad | Bluepad
Bluepad
'विद्या विनयेन शोभते’
Mrs. Mangla Borkar
Mrs. Mangla Borkar
23rd Nov, 2022

Share

विद्या ही अलंकारासाठी वापरल्यासारखी वापरल्यास तिची सजावट खुलून दिसते. अन्यथा तीच्या सजावटीतून अहंकाराचा दर्प ( स्वाद) येऊ लागतो. आजकाल जितकी जास्त विद्या तितके जास्त उच्च अधिकाराचे पद,तितका जास्त पैसा, तितका जास्त अहं, हे जणू समीकरणच झाले आहे.मी तेवढा श्रेष्ठ बाकी सारे कनिष्ठ या भूमिकेतून जो तो दुसर्याला पाहत असतो.
“तू खूप खूप शिकून मोठा हो” किंवा “मोठी हो” हे आशीर्वाद पद वाक्य आपण शाळेत असल्या पासून एकत आलेले असतो. ”पण तू जरी खूप शिकलीस तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव, तू आत्मसाद केलेल्या विद्येचा गर्व करू नकोस”, असे किती वडिलधारे सांगतात? शिक्षक तर सतत चांगले मार्गदर्शक करत असतात त्या मुळेच माणूस असं शिकत शिकत मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की तसच त्याच्या अहंकाराचा फुगा वर वर जात राहतो.
शालेय जीवनात संस्कार नावाचा जो काही प्रकार शिकवला जातो त्या अंतर्गत श्लोक,देशभक्ती च्या गोष्टी , शिवरायांचे विर्प्रसंग किवा बिरबल कथा यांचा फार मोठा समावेश होता.काही गाणी नाटुकली यांमधून समाजप्रबोधनाचे थोडे बहुत बाळकडू पाजले जात. पण इतिहासापासून प्रेरणा आणि बोध घेऊन यातील चांगल्या गोष्टी वर्तमानात अंमलात आणल्या तर आपल्याला भविष्य सुखकर होईल याचे ज्ञान कोणी मुलांना देत का??
विद्या हि ज्ञानाचा सागर आहे. विद्येतून आपल्याला ज्ञान मिळते, ज्ञान मुळेच आपल्याला यशाचा मर्ग मिळतो. मदार तेरेसाच्या सेवेचे मोल जगाला उमगले आहे. १९७९ साली त्यांना शांततेचे नोबल पारितोषिक मिळाले.तिसरी संपूर्ण रकम सुधा त्यांनी गरिबान साठी खर्चण्याचे ठरवले. भारताने हि भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. त्याच प्रमाणे अनेक लेखक , नामवंत कवी यशाच्या शिखरावर गेले,ते त्यांच्या कडे असलेल्या नम्रतेने. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे वि.स.खांडेकर, कुसूमाग्रज यांचे फोटो, चित्र पाहताच ‘विद्या विनयेन शोभते’ याचा खरोखर प्रत्येय येतो.
उंच विशाल वाढलेले वृक्ष हे एकार्ध्या तपस्व्या प्रमाणे असतात. त्यांची मुळे जमिनीत घट्ट रुजलेली असतात.त्यांना लागलेले मधुर,रसाळ फळे हि त्यांना परिपक्वतेची प्रचीती देणारी असतात.आपल्या लांबच लांब पसरलेल्या फांद्यांपासून ते येणाऱ्या-जाणार्यान वर सावली धरत असतात. प्रवासी त्यांच्या सावली खाली बसतात. फळांचा आस्वाद घेतात. हे झाड खूप साऱ्या जणांना शांत करते. झाडांवर निबंध लिहिणारे, झाडे लावा झाडे जगवा अभियान चालवणारे या सर्वांचा आदर्श डोळ्या समोर का ठेवत नाही?
अनेक विद्वानांची चरित्र वाचल्यावर आपल्याला ‘विद्या विनयेन शोभते ‘ या उक्तीचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही.
श्रीमती मंगला बोरकर

178 

Share


Mrs. Mangla Borkar
Written by
Mrs. Mangla Borkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad