Bluepad | Bluepad
Bluepad
बोइट🐋
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
23rd Nov, 2022

Share

दूरवरचा प्रवास करत निघालो "बोइट" मासे पकडायला . ह्या माशांची खासियत आहे की ते सहजासहजी गळाला लागत नाही. घोळका च्या घोळका नदीकिनारी फेरफटका मारायला येतो , पिठाच्या गोळ्याला स्पर्श करत , हळू - हळू टोचा मारत ठुनुक देतात , पण गळाला 🎣 लागत नाहीत.
८ दिवस झाले ..छडी घेऊन माझा मित्र रोज नदीकाठी बसायचा . त्याने सुद्धा चंग बांधला होता की एक तरी बोइट पकडायचा च . त्याच्या हाती एक सुद्धा लागला नव्हता.
नवी कोरी इंग्लिश स्टिक आणली ,गळाला कोलंबी ,सुकट ,पीठ लावून बघितले. तरी काही यश मिळाले नाही.
नंतर खूप विचार-विमर्ष झाले. कळत नव्हतं करायचं काय ?
मग ठरल नदीचा अभ्यास करूयात...की अस का होत.
त्या नदीत मोठं मोठ्या मगरी होत्या. त्याना त्या पाण्यात अधिराज्य गाजवायला आवडत होत. त्यांची दहशत सुद्धा तेवढीच होती. कारण मोठं वरदहस्त आणि स्थायिकत्व त्यांच्याकडे होत.
ब्लॅक गोल्ड च त्या रक्षण करीत होत्या. आणि त्यावर त्यांची च मालकी होती असा त्यांचा समज होता. ह्याच कारणास्तव छोटे - छोटे बोइट सुद्धा सावध होते. सहजपणे कोणाच्या हाती कसे लागतील.
हुशार , सावध , फुकुन फुकुन पीठ खाणारे , अश्यावेळी त्यांना नवीन खाद्य टाकावे लागणार हे नक्की होत. ते खाद्य म्हणजे "गांडूळ" ! त्याची चव बरेच वर्ष चाखली नव्हती बोइट माशांनी ..
मासेमारी करण्यासाठी आलेले मच्छिमार हे समुद्राच्या जवळचे होते...त्यांना पाग टाकून मासेमारी करायला जमत होत ,पण गळछडी वर मासे पकडण्यासाठी संयम हवा होता.
खाडीवर अधिराज्य करण्यासाठी वेळ जाणार होतीच , त्यापहिले मोठ्या मगरीचा बंदोबस्त करायचा होता. त्या मगरी बोइट पासून सर्व माशांच्या संगनमताने वावरत होत्या. त्यामुळेच सावध होत्या. हळू हळू पीठ चाखत होत्या. कारण त्यांना वेळ घालवून द्यायची होती. मच्छिमार आले होते व्यवसाय करायला , त्यांना लवकरात-लवकर मासे पकडून बाजारात विकायचे होते. पण जस जशी वेळ जात होती ...खर्च पण वाढत होता.
ते त्या मच्छिमारांना परवडणार नव्हतं.
शीतयुद्ध चालू होतं. प्रत्येक मासा आपली स्वतःची चाल खेळत होता. आणि त्या मच्छिमारांना गांगरवत होता. नवीन जागा असल्याने मच्छिमार सुद्धा सावध होते. पण योग्य वेळेची वाट पाहत होते.
खेळ उधाणाचा होता.. पाणी शांत झालं की काही करू शकत नव्हत. भर उधाणात च जे काही करायचं होतं ते करायचं च होत.
बोईट व इतर माशांना पाहिले पीठ (प्रेम)चाखायला मिळालं , सुकट(विश्वास) -कोळंब्या (हिम्मत) मिळाल्या नंतर गांडूळ (पैसा) मिळालं.
आणि ती वेळ आली.
जेव्हा मच्छिमारांनी गांडुल फेकण् बंद केलं. बोइट व इतर माशे कावराबावरा झाले. सैरावैरा पळू लागले की खाण- पान बंद झालं आता काय करायचं .
त्याचवेळेस एक ठिकाणी मच्छिमारांनी पाग टाकला ...आणि भरघोस मासेमारी केली.
बोइट व इतर माशे जवळ आले ...विनवणी केली... तेव्हा
मच्छिमारांनी तह केला.
एक हातात माल तरच दुसऱ्या हाथाने खाल !
आता वेळ होती त्या मगरीची ...मच्छिमारांनी पाण्यात त्यांना तसंच ठेवलं . पण त्या ज्या जागी आराम करत होत्या...तिथली मातीच उचलून नेली.
मग त्याना गपगुमान पाण्यात वास्तव्यास राहायचं च होत. नाहीतर अंत झाला असता.
कथेच्या शेवटी मगरीला आणि मच्छिमारांना बोइट हवेच नव्हते त्यांना हवा होता तो "ब्लॅक गोल्ड"
त्यावर अधिकार फक्त मच्छिमारांचाच होता.
स्वप्नाळू🔥✒️

170 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad