Bluepad | Bluepad
Bluepad
स्पर्धा परीक्षांच्या विळख्यात अडकलेली आजची तरुणाई
T
Tushar Dabhade
23rd Nov, 2022

Share

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांच्या संधी कमी होत आहे. त्यातच अनेक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांच्या नेमणुका केल्या जातात.उज्वल भविष्य मिळविण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शाश्वत मिळणारी नोकरी,समाजामध्ये मिळणारा मान - सन्मान आणि उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झगडतात.ग्रामीण भागातील पालक आपल्या मुला-मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शहरी भागात स्पर्धा परीक्षेची केले जाणारे जबरदस्त मार्केटिंग ला भुलून मुला मुलींना शहरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पाठवतात.
ग्रामीण भागात अपुऱ्या असणाऱ्या सोयी सुविधा,त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य अंधारमय होईल ही काळजी या पालकांना असते.त्यामुळे शहरांमध्ये चांगल्या क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊन तिथे राहण्या - खाण्याची व्यवस्था करण्यासाठी,ग्रामीण भागातील शेतकरी,मजूर मिळेल त्या मार्गाने पैसा गोळा करून मुलांच्या भवितव्यासाठी लावतात.आई बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुले मुलीही अभ्यासाचा ध्यास घेतात.कुठल्याही स्थितीत स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं म्हणून डोळ्यात वात घालून अभ्यास करतात.मोठमोठ्या क्लासेस मध्ये ऍडमिशन घेतात,परंतु मुलांचे भविष्य अंधारमय ठेवण्यात सरकारचे स्पर्धा परीक्षेतील अनेक उणिवा असेल हे सर्व जबाबदार आहेत.एकतर स्पर्धा परीक्षांच्या जागा लवकर निघत नाही, निघाल्या तर त्याच्या परीक्षा वेळेवर होत नाही,परीक्षा वेळेवरती झाला तर निकाल वेळेवर लागत नाही,निकाल वेळेवर लावला तर नियुक्ती वेळेवर मिळत नाही.हि सर्व प्रक्रिया चालू असताना ऐन तरुणाई मध्ये असणारे हे मुले - मुली आपल्या वयाचे भान विसरून स्पर्धा परीक्षांच्या मागे धावत असतात.कारण त्यांना आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे असतात.स्वतःचे उज्ज्वल भविष्य निर्माण करायचे असते.समाजापुढे आपण आदर्श मुलं - मुली आहोत हे दाखवायचं असतं. या सर्व मृगजळाच्या मागे धावत असताना ते मात्र स्वतःचं अस्तित्व विसरून जातात.आपल लग्नाचं वय निघून जाते आहे ,याकडे ते दुर्लक्ष करतात.
स्पर्धा परीक्षा म्हणजे नशीब आणि प्रयत्नांची सचोटी असं म्हटलं तर ते वाव ठरणार नाही.त्यात प्रत्येकालाच अपयश येते,असेही नाही.यश मिळविणारे विद्यार्थी समाजापुढे आदर्श असतात.शाळा कॉलेजमध्ये जेव्हा हे यशस्वी झालेले विद्यार्थी भाषण देतात,तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना सनदी अधिकाऱ्यांचे स्वप्न पाहतात.भविष्यात आपल्यासह कुटुंबाला सुख मिळेल या हेतूने कॉलेज तरुण - तरुणी स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात अलगतपणे ओढले जातात आणि सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात.हा अभ्यासक्रम चालू असताना जागा सुटल्यानंतर लाखो च्या प्रमाणात मुले फॉर्म भरतात.बरेच मुले पूर्वपरीक्षा पास होतात,पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर वर्षे - चार वर्षांनी मुख्य परीक्षा देतात,मुख्य परीक्षा पास होतात,त्याच्यानंतर मुलाखत असती तर मुलाखतीमध्ये देखील काही विद्यार्थी पास होतात, अनेक विद्यार्थी अपात्र होतात. मुलाखतीमध्ये अपात्र झालेले विद्यार्थ्यांना पुन्हा पूर्व परीक्षा द्यावी लागते.पुन्हा बे एके बे चालू होते.एक दोन वेळेस परीक्षा दिल्यानंतर मुलांची मानसिकता घालवलेली असते.आपण स्पर्धा परीक्षा क्लियर करू शकत नाही,ही निराशा त्यांना सतावते.
आई-वडिलांनी कर्ज काढून आपल्या शिक्षणासाठी अतोनात पैसा ओतलेला असतो ही जाणीव त्यांना असते.आणि त्याचे मानसिक दडपण ते घेत असतात.ज्या कारणासाठी कर्ज काढले होते ते आपण साध्य करू शकलो नाही,ही खंत त्यांच्या मनाला दिवसेंदिवस पोखरत असते.याचा दुष्परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो.बरेच विद्यार्थी नैराश्यात जातात,तर काहीजण आत्महत्या करतात. कमी होत जाणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण केवळ बेरोजगारीवरच नाही तर तरुण मुलांचे संसार थाटण्यावरही होत आह. स्पर्धा परीक्षांच्या गर्गेत अडकलेली आजची तरुणाई मोठ्या आशेने - अपेक्षेने ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षा देतात.परंतु अपेक्षित प्रमाणे यश न मिळाल्याने मोठ्या नैराश्याचा सामना आजच्या तरुणाईला करावा लागत आहे.यातून फायदा झाला तो फक्त स्पर्धा परीक्षा क्लास चालवणाऱ्या चालकांचा,स्पर्धा परीक्षेचा ठेका घेणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या, परीक्षेसाठी भरावे लागणारे भरमसाठ चलन.त्यामुळे सहाजिकच संबंधित बँकांचा टर्न ओव्हरही वाढलेला असतो.नुकसान होते ते फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेच्या मागे लागून सनदी अधिकारी स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईचा आणि त्यांच्या पालकांचा. यावर शासनाने निश्चित निर्णय घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू पाहणाऱ्या तरुणाईला आधार द्यावा जेणेकरून त्यांचे स्वप्न पूर्ण होऊन संसार थाटेल.
- तुषार दाभाडे.
मो.९९६०९२३३७७

176 

Share


T
Written by
Tushar Dabhade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad