Bluepad | Bluepad
Bluepad
*खाजगीकरण*
तुषार पाटील
तुषार पाटील
23rd Nov, 2022

Share

* खासगीकरण हा गुलामीचा फास आहे जो हळूहळू तुमचा गळा दाबेल !*
*खाजगीकरण प्रथम सरकारी कार्यालय - उद्योगधंदे यांची बदनामी करते. BSNL चे उदाहरण आठवा. रेंज नाही,कॉल कट होणे, इत्यादी. नंतर खाजगीकरणाचे समर्थक सरकारद्वारेच सरकारी उद्योग बंद पाडतात. नंतर तेच उद्योग कवडीमोलाने विकत घेतात व ‘दुनिया मुट्ठी में’ म्हणून धंदा करतात. आता रेंज नसली वा कॅाल कट झाला वा जास्त बील आले तरी कुठे चर्चा नाही ! डावपेच लक्षात घ्या !! *
* आता डोळा आहे शिक्षणावर ! तुम्ही आम्ही झेड पी - म्युनिसिपल शाळांत शिकलो. तुटपुंजी का असेना पण स्कॅालरशिप मिळायची, फी माफी असायची. आता हे सर्व बंद होत आहे. सरकारने शाळा काढणे बंद केले आहे. खाजगी उद्योगपतींनी येवून शाळा - कॅालेजेस - विद्यापीठे काढावीत , असे सरकार म्हणत आहे. तिथे भरपूर फी असेल जी तुम्हाला परवडणारी नाही. तसेच फी माफी नाही , स्कॅालरशिप नाही. मग तुम्ही कसे शिकणार ? *
* सरकारी दवाखान्याचेही तसेच ! पूर्वी सरकारी दवाखान्यांत मोफत उपचार - औषधे भेटत असत. आता तिथेही औषधे बाहेरून आणा , एक्स रे बाहेरून काढा , टेस्ट्स बाहेरून करून घ्या , असे चालू आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. सरकार खाजगी दवाखाने काढण्यास प्रोत्साहन देत आहे. तेथील महागडे उपचार तुम्हाला परवडणारे नाहीत. मग तुम्ही आजारी पडलात व खिशात पैसे नसले तर काय करणार ? हातपाय खोडून मरणार ? *
* सरकारी खात्यात भ्रष्टाचार आहे म्हणून खाजगीकरण चांगले , असे काही जण म्हणतात. त्यांचा असा गैरसमज असतो की, खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार नाही ! खाजगी क्षेत्रांत तंत्र सरकारी खात्यापेक्षा १०० पट जास्त भ्रष्टाचार असतो. फक्त त्याच्याशी नागरिकांचा संबंध येत नाही, म्हणून त्यांना तो कळत नाही व बाहेर दिसतही नाही. खाजगी क्षेत्रांतील टेंडर्स , कच्चा माल आणणे , नेमणूका करणे यांत भरपूर देवाणघेवाण होते ! ही देवाणघेवाण सामान्य नागरिकांना कळत नाही. म्हणून खाजगी क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त आहे , असे त्यांना वाटते. *
* तो काळ दूर नाही जेव्हा इतिहास शिकवला जाईल जो भारताची शेवटची सरकारी शाळा,सरकारी ट्रेन, शेवटची सरकारी बस, शेवटची सरकारी वीज कंपनी, शेवटचा सरकारी विमानतळ आणि शेवटचा सार्वजनिक उद्योग होता ! *
*कोणत्याही सरकारी उपक्रमाचे किंवा सरकारी संस्थांचे खाजगीकरण झाल्यास सामान्य जनतेच्या मौनाचा एक दिवस संपूर्ण देशाला महागात पडेल. कारण जेव्हा सर्व शाळा, सर्व रुग्णालये, रेल्वे स्टेशन, विमानतळ वीज, पाणी, सर्व खाजगी हातात असेल, तेव्हा देश कंगाल झालेला असेल !*
*लक्षात ठेवा की, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हे सरकार आणि सरकारी उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. तर खाजगी संस्थांचे उद्दिष्ट किमान खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवणे हे आहे. *
*खाजगीकरणाच्या षडयंत्रावर देशातील जनतेने मौन बाळगणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या गुलामीचा फास बळकट करणे !*
*त्यामुळे तुम्ही जागे व्हा आणि तुमचा देश आणि देशाची सार्वजनिक संपत्ती वाचवा. रेल्वे वाचवावी लागेल, सरकारी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था वाचवाव्या लागतील,सरकारी वीज कंपनी (एम एस ई बी), एलआयसी, बीएसएनएल, टपाल कार्यालये वाचवावी लागतील, सरकारी कर्मचारी आणि सरकारी विभाग वाचवावे लागतील.*
*अडचणीत फक्त सरकारी विभागच कामाला येतात, कोणतेही खाजगी विभाग काम करत नाही, ज्याचे उदाहरण तुम्ही अलीकडेच पाहिले असेल. किती खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांवर मोफत किंवा किमान दराने उपचार करत होती ? किती खाजगी बस मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना घेऊन जात होत्या ? किती खाजगी संस्था आणि स्वयंसेवी संस्था जमिनीवर उतरून जनतेला मदत करत होत्या ? कोविड काळात देखील कोणत्याही खाजगी विमान कंपन्या भारतीयांना मोफत एअरलिफ्ट करत नव्हत्या !*
*त्यामुळे प्रत्येकाने खाजगीकरणाला विरोध केलाच पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळात फक्त काही उद्योगपतीच हा देश चालवतील आणि पूर्वीसारखे गुलामीचे युग भारतामध्ये पुन्हा येईल. फक्त यावेळी सत्ता आणि संपत्ती या मौल्यवान गोष्टी मूठभर लोकांच्या हातात असतील !*
*लक्षात घ्या , राजकीय शक्ती हा फक्त एक देखावा असतो. तो किती व कोणता सजवायचा हे उद्योगपतीच ठरवतात. म्हणून राजकीय बांधिलकी नाकारून खाजगीकरणाला विरोध करा !*
* भारत माझा देश आहे. तो वाचवण्यासाठी मी पुढे आले पाहिजे !*
✊✊✊

178 

Share


तुषार पाटील
Written by
तुषार पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad