Bluepad | Bluepad
Bluepad
वेळेचे व्यवस्थापन
Kalpesh
Kalpesh
23rd Nov, 2022

Share

वेळेचे व्यवस्थापन
तुम्हाला वेळ व्यवस्थापन हे कठीण काम वाटते का? तुमच्याकडे असलेल्या सर्व कामांमध्ये संतुलन राखणे वेळेत काम पूर्ण करणे किंवा वेळेअभावी कामांची टाळाटाळ करणे हे मोठे चॅलेंज वाटू शकतात पण हे अगदी सामान्य आहे.
पण वेळेचे योग्य व्यवस्थापन शिकणे हे आजच्या धावत्या जगात टिकून राहण्याचे मुख्य शस्त्र आहे.
कॉलेजमध्ये भरपूर विषय असायचे तेव्हा त्यांचा अभ्यास आणि इतर ॲक्टिविटी यांमध्ये वेळेच गणित बसवताना नाकी नऊ यायचे कॉलेज संपलं मग ऑफिस मध्ये कामांमधून वैयक्तिक वेळ काढणे कठीण होत गेले आणि वेळ कधी कसा उडून चाललाय हेच कळत नाही, हा वेळ असाच जात राहील जोपर्यंत आपण स्वतःला विचारात नाही की माझं वेळ कुठे चाललाय, का मला वेळेची कमतरता भासते. याच प्रश्नांमध्ये वेळेच गणित तुम्हाला कळेल.
गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे जास्त उशीर करू नका आजच हा प्रश्न स्वतःला विचारा आणि बघा किती वेळ तुम्हाला मोकळा मिळतोय, ज्या गोष्टी सुरू करायच्यात त्या मिळालेल्या मोकळ्या वेळेत बसवता येतील हे बघा.
दिवसाच्या २४ तासांचे व्यवस्थापन योग्यरीत्या करायचे असेल तर काही मुद्दे नक्कीच लक्ष्यात ठेवा
१. आपल्याला आज काय करायचेय याची स्पष्टता :
आज मला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत? मी ठरवलेल्या अतिरिक्त गोष्टींसाठी मी कोणता वेळ देऊ शकतो ? या दोन प्रश्नांत तुमच्या पूर्ण दिवसाच्या वेळेच गणित तुम्हाला मिळेल, सकाळी थोडा वेळ द्या एक पेन पेपर घेऊन त्यावर कोणती काम आज करायची आहेत ते स्पष्ट लिहा.
आपल्या विचारांची स्पष्टता आपल्याला कामांवर लक्ष्य केंद्रित करायला आणि काम योग्य वेळेत पूर्ण करायला मदत करतात.
२.शेड्यूल/कार्य-सूची बनवा-आणि त्यावर ठाम राहा!
ऑफिस मध्ये आपण आऊटलुक/ मेल वापरतो पण त्यामध्येच असलेला कॅलेंडर, to-do लिस्ट यांचा वापर करतच नाही खरतर हे खूप प्रभावी माध्यम आहे, आपली काम शेड्युल करा कलेंडर मध्ये नमूद करा.
हे मला उत्पादनक्षम वाटते आणि मला माझी आणखी यादी तपासण्याची प्रेरणा देते.
जर तुम्ही एका दिवसात सर्वकाही पूर्ण केले नाही तर घाबरू नका. दुसर्‍या दिवसासाठी ते जतन करा, फक्त कार्य बंद ठेवू नका ते पूर्ण करा.
३.हुशारीने प्राधान्य द्या
बऱ्याच वेळा आपण कामांमध्ये अडकून जातो, मल्टी टास्किंग च्या नावाखाली एकही काम धड होत नाही.
एका वेळी बरीच काम करण्यापेक्षा ती योग्य वेळी विभागणी करून केल्याने योग्य रीतीने आणि योग्य वेळेत होतात. त्यांची विभागणी करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे ठरवा आणि ती आधी पूर्ण करा.
४. व्यत्यय कमी करा
एखाद काम करत असताना एखाद्या मित्राचा / मैत्रिणीचा फोन येतो आणि आपण तासनतास बोलत बसतो, नाहीतर व्हॉट्स ॲप, फेसबुक आहेतच कामात व्यत्यय येईल अश्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील, ज्या वेळेत जे काम ठरवलं आहेत ते पूर्ण करून मग त्यांना वेळ देता येईल का हे बघा. "थोडा व्यस्त आहे थोड्या वेळाने फोन करतो" असा मेसेज तयार ठेवा.
५. विलंब करू नका (प्रोकास्टिनेशन टाळा)
एखादी गोष्ट आपण ठरवली तर ती पुढे ढकलू नका ती पूर्ण करा. जेव्हा आपण डेड - एंड (शेवटपर्यंत) खेचतो तेव्हा ती कामतरी खराब होतात नाहीतर होत नाहीत.
त्यामुळे आजच काम आज करू शकतो यावर ठाम रहा.
उद्यासाठी जे काम राहील ते कमी महत्त्वाचे असेल तरीही उद्या सर्वप्रथम कराल यावर लक्ष्य द्या.

184 

Share


Kalpesh
Written by
Kalpesh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad