Bluepad | Bluepad
Bluepad
प्रिय जावई,
Deepak Nalawade
Deepak Nalawade
23rd Nov, 2022

Share

प्रिय जावई,
२७ वर्षापुर्वी आमच्या घरी
आली सुंदर अशी परी
झाले सर्व आम्ही आनंदी
जशी लक्ष्मी आली घरी
चिमुकल्या पावलांनी सर्व
घराचा घेतला ताबा
तिच्याच मागे सर्वांचाच
असे राबराब राबा
दिवसां मगून दिवस
जात राहिले आपल्या मार्गे
चिमुकली परी ही निसर्ग
नियमांने वाढ करी आपली
आई बाबा आई बाबा
करत राही आमची परी
तिला अन् आम्हास काय ठाऊक
होणार आहे आमच्यात दुरी
वाढवली आम्ही प्रेमाने, मायेने
आईने दिले तिला उच्च संस्कार
मनमिळाऊ असे आहे आमची परी
हेवादावा तर कोणाचाही नाही करणार
लई जपलीय तिला आम्ही आता
सोपवत आहोत तुमच्या हाती
खरंच होती ती आमच्या घराण्याची शान
सजविल ती आता तुमच्या घराचे निशाण
वागणं तिचं, बोलणं तिचं
लहानथोर जपणं तिचं
दुःख लपवून हसणं तिची आदा
आठवत आणि सतवत राहील सदा
शंभरगुणी, सुसंस्कृत पोर आमची
ऊनवारा,पावसातही साथ देईल तुमची
लक्ष्मी बनून येतेय तुमच्या घरी
अजून खूप वैभव प्राप्त करी
घेईल संभाळून सर्व थोरामोठ्यांना
सर्वांचा मानसन्मान आदर करुन
पण जर कुठे जरा चुकले तिचे
तर लागलीच माफ करा तिला
लई जपलीया पोर,
आता घ्या तुमच्या पदराखाली
जीव लावला जिवापेक्षा
आता होईल तुमच्या घरची राणी
मुलीचा बाप..
दिपक बजरंग नलावडे
०८/१२/२०२१
THANK YOU Deepak Nalawade KAKA FOR YOUR AWESOME POEM 🙏🙏👍👍

190 

Share


Deepak Nalawade
Written by
Deepak Nalawade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad