Bluepad | Bluepad
Bluepad
कोण होतास तू काय झालास तू...! अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू..!
Nagesh Karpe
Nagesh Karpe
23rd Nov, 2022

Share

काळ बदलला... वेळ बदलली... साऱ्यांना भुलवित चाललीस तू . तडक लैला वाणी, बदनाम झालीस तू ....
कोण होतास तू काय झालास तू...! अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू..!
हे झुंज या चित्रपटातील गीत आज घडीला तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील उपोषण मागे घेतलेल्या श्री खंडोबा देवस्थान संघर्ष समीतीच्या चक्री उपोषण आंदोलनास तंतोतंत समर्पक आहे.
जनता जनार्धन आपल्यावर विश्वास ठेवून पाठिंबा देते. याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेऊन त्या जनतेचा विश्वासघात केल्यास येणाऱ्या परिणामास भोगण्याची तयारी ठेवावीच लागेल आणि हे परिणाम म्हणावे तितके सोपे नसणार हे मात्र निश्चित आहे!
कोण होतास तू काय झालास तू...! अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू..!
उस्मानाबाद दि.22 प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे गेल्या 90 दिवसापासून चालू असलेल्या खंडोबा मंदिर संघर्ष समितीच्या वतीने शेत जमिनीची केलेली विक्री,मंदिरा लगतचे वाढते अतिक्रमण,भाविकांच्या गैरसोयी तसेच मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट होत असल्याचे तसेच आदी मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय संपणार नाही असा ग्रामस्थांसह मानकरी व भाविकांचा समज होता परंतु असे कांहीच घडले नाही तर घडले ते विचित्रच! अचानक झालेल्या या घडामोडीनंतर तुळजापूर येथील तहसीलदाराकडे बैठक होऊन या बैठकीत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांने घेतला तेंव्हा सर्वात जास्त भुवया मी उंचावल्या आणि येथेच अरविंद घोडके याने आपले उपोषण बिनशर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारणा केली असता मी उपोषणाला बसलोय मी उठणार त्यात गावचा संबन्ध काय असे निर्लल्ज उत्तर देऊन अणदूर ग्रामस्थांसाठी हा एक मोठा धक्काच आहे. आंदोलन मागे घेण्याबाबतचा हा निर्णय एकतर्फी असल्याचे दिसत असून पुढे हे आंदोलन निकराने चालू ठेवण्यासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. या संदर्भात मंगळवारी एक जाहीर सभा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु नळदुर्ग पोलीस प्रशासनाने या सभेला परवानगी नाकारल्याने प्रशासनासह अनेक दलालांचे पितळ आजतरी शाबूत राहीले हे नक्की! यापुढे हे आंदोलन चालू राहील किंवा न राहील पण ज्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा चंग बांधला व अर्थपूर्ण वाटाघाटी केल्या त्यांनी ग्रामस्थांचा,भाविकांचा विश्वासघात तर केलाच मात्र लोकशाहीतील उपोषणाची धार बोथट करण्याचे घोर पाप केले हे महाभयानक झाले.
ज्या ग्रामस्थामुळे, समाजामुळे हे आंदोलन उभे राहिले त्या समाजालाही वाऱ्यावर सोडल्याने न्याय मिळाला नसण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आता यापुढे विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आंदोलनामुळे गावची बदनामी कोणी केली? हाही मोठा प्रश्न आहे.आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात देवस्थानची व देवाची व गावची नाहक बदनामी होऊ नये यासाठी पत्रकार बांधवानी वृत्त छापायचे नाही असा निर्णय घेतला होता परंतु एका वृत्तवाहिनीने गडबडीत हे वृत्त चालवले असता ज्यांनी हे व्रत चालवले त्या पत्रकाराला खंडोबा ट्रस्टीच्या सचिवाने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळही केली त्यानंतर ट्रस्टीच्या अध्यक्षाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येथील जेष्ठ पत्रकारास माफीनामा लिहून दिल्याने हा विषय येथेच संपला होता. गाव पेटत राहिले पाहिजे या मताचा देवस्थान ट्रस्टीचा खाजवा उठारेट्या सचिव गप्प बसला नाही सोशल मीडियावर नको ते उपद्व्याप करून आपल्या अकलेचे दिवे पाजळले. अखेर याचे पडसाद तीव्र मतभेद सुरू झाले आणि नाहक राज्यात गावची देवस्थानची बदनामी करण्याचा चंगच जणू या सचिवाने बांधला आणि साधला.
आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत होता प्रत्येकाच्या मनात खदखदणारी ही बाब यापुढेही चालू राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असून भविष्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट चित्र असून देवस्थान शासन दरबारी वर्ग करून मंदिरातील भ्रष्ट कारभार त्यातून गब्बर झालेले पुजारी,राजकीय दलाल यांचा हिशोब चुकता होणार आहे.
गावास भावनिक करून,गाव बंद करून, माझा मुडदा गावाबाहेर जाईल मात्र मी मागे हटणार नाही असे आवाहन करून अखेर अचानकपणे ज्यांनी आंदोलन मागे घेतले त्यांच्यामुळे विश्वासार्हता संपत आहे.
गावात उलट सुलट चर्चा सुरू असून राज्यात घडलेल्या खोके एकदम ओके झाले काय हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात एकत्र येत असून आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. यात्रा तोंडावर आल्यामुळे पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी नाकारली असली तरी देव मैलारपूरला गेल्यानंतर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच सभेत आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे.

177 

Share


Nagesh Karpe
Written by
Nagesh Karpe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad