Bluepad | Bluepad
Bluepad
आपले आदर्श तपासा .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Nov, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 आपले संस्कार हे भक्तीला पोषक असे पाहिजेत . समाजामधे २०-२५ वर्षांपासून सिनेमा व नाटक यांचा प्रभाव पडला आहे . सिनेमातील पोशाख , त्याची सीगारेट ओढण्याची स्टाईल , त्यांचे संवाद हे अधुनिकता प्रगतीचे आदर्श मानले जाऊ लागले आणि इथेच सांस्कृतीक पर्यायाने भक्तीचा पाया ढासळण्यास सुरवात झाली . वैयक्तिक शिक्षण व आर्थिक प्राप्त करणे , तंत्रज्ञान वापरुन जिवन सुखी करणे यातून आपण लोभ मोह माया यात अडकलो आणि काम क्रोध व मत्सर या आयुधांनी जिवनात सर्व गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला .
अनेक जण राजकारणात आले त्यांनी देशहित व समाजहित न करता सिनेमातील भ्रष्ट राजकारण्यांचा आदर्श ठेवला तो चुकीचाच आहे . सरकारी नोकरी भ्रष्ट मार्गाने मिळवून लोकांना सहाय्य न करता अवैध मार्गाने धन व अधिकार गाजवणे हेच ध्येय साधले .
अशा या भ्रष्ट व चुकीच्या आदर्श अनुसरण केल्याने अध:पतन मोठया प्रमाणात झाले .
आजचे जे अधःपतन दिसून येत आहे ते याच कारणामुळे . आपण करतो एक अपेक्षा भलत्याच करतो .
भावी पिढी वा देशहितासाठी खूप कठोर परिश्रम आपण सर्वांनी घेतले तरच आपला वारसा टिकणार .
नाहीतर पैसा असून सुख नाही असे होणार .
कारण पैशाने सर्व गोष्टी प्राप्त होत नाही , होणार नाही .
सन्मार्गाने चला ' सार असार जाणा .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो .
🙏 श्रीकृष्ण सावरगांवकर
र३/११/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आपले आदर्श तपासा .

167 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad