Bluepad | Bluepad
Bluepad
लबाड कुठली...माझी कविता.
डॉ अमित.
डॉ अमित.
22nd Nov, 2022

Share

लबाड कुठली...माझी कविता.
लबाड कुठली...माझी कविता.
लबाड कुठली...माझी कविता.
सुचावी सुचावी म्हटलं की सुचत नाही
मोकळ्या वेळेत लिहावं म्हटलं
की शब्दं जुळून येत नाहीत
पण कशी द्वाड आहे पाहा ना ही
कुठल्यातरी कामात असतो मी
नि तेंव्हा नकळतं स्फुरूनं जाते
चोरुन दोन ओळी ओठांवर पेरून जाते
नि हळूचं मनाच्या कोपऱ्यात
मग अलगद जावून बसते
ही कविता पाहा ना
माझ्याशी कशी भलतीचं लबाडी करते...
प्रेमात असतो मी जेंव्हा
विरहगीत गुणगुणू लागते तेंव्हा
खुशीत असता मी जाम
तेंव्हा उगाच काहीसं मन हेलावणारं गाते
पण त्यामुळेचं की काय ती माझे पाय
कायम जमिनीवर राहावेत असेच वागते
कधी रुसले मन तर खुदकनं हसवते
मनावरच ओझं क्षणातं दूर करते
वेड्या या मनाला हलकेच गोंजारत राहते
ही कविता पाहा ना
माझ्याशी कशी भलतीचं लबाडी करते...
तिची नि माझी भेट तशी खूप जुनी
शाळेत असेन मी तेंव्हा अगदी लहानपणी
मनात दडलेल्या शब्दांना ती कुरवाळतं राहायची
कधी कधी ती माझ्या स्वप्नातही यायची
लाडे लाडे माझ्या मनातलं कागदावर उतरवायची
उगाच माझी अधून मधून ती थट्टा करत राहते
शब्दात रमणाऱ्या मला कधी कधी निःशब्द करते
मौन धरून बसलो तर मात्र लगेच बोलतं करते
माहितीय मला ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते
ही कविता पाहा ना
माझ्याशी कशी भलतीचं लबाडी करते...
नातं तिचं नि माझं सांगू कोणतं ते कसं
नाव त्याला देवू काय आणि ते ही कसं
काही काही नाती ही अनामिकच बरी
नाव जरी नसले तरी असतात मात्र खरी
एकटं मला पडू देत नाही की
रागावली तरी सोडून जात नाही
लाजते रुसते कित्येकदा ती रागे रागे भरते
माझ्या आनंदासाठी ती किती किती करते
माझ्या सुखासाठी ती केंव्हाही शब्दरूपं घेते
ही कविता पाहा ना
माझ्याशी नेहमीचं अशी गोड लबाडी करते...
डॉ अमित.
मंगळवार.
२२ नोव्हेंबर २०२२.

180 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad