Bluepad | Bluepad
Bluepad
ओळख आपल्या डोळ्यांची
Kiran Sarjine
Kiran Sarjine
22nd Nov, 2022

Share

सौंदर्य बघण्याच सुख म्हटल कि डोळे महत्त्वाचे कारण त्याशिवाय हा उपभोग अशक्य. तसे डोळे खुप नाजूक अवयव. पण हाच अवयव कोणकोणत्या गोष्टींनी एकत्र बनलाय माहिती आहे का? नाही ना तर मग चला जाणून घेऊ.
१)कॉनिया - हि डोळ्यातली समोरची खिडकी ज्यातुन प्रकाश आत जाऊन एकत्र केंद्रीत होतो.
२) आयरिस - आपल्या डोळ्याचा आतील भाग ज्यावरून आपल्या डोळ्यांचा रंग ठरतो.
३) लेंन्स - डोळ्याच्या मागील भागात प्रकाश किरण एकत्र करून पोहचवण्याचे कार्य हा भाग करतो.
४) प्युपिल - केंद्र स्थानातील महत्त्वाचा भाग . प्रकाश किरण किती प्रमाणात आत जावी यावर अवलंबून असते त्यानुसार याचा आकार कमी जास्त होते.
५) रेटीना - हा डोळ्यापाठीमागचा पडदा ज्यावर किरण एकत्र येऊन त्याची माहिती मेंदुपर्यत पोहचवली जाते.
६) मॕकुला - हा एकतर लहान ठिपका किंवा भाग ज्यामुळे दिसणारी प्रतिमा सुस्पष्ट दिसण्यात मदत होते.
काय मग माहिती पडल ना आपला डोळा किती अवयवांनी एकत्र मिळून बनलाय.
शब्दांकन
किरण सरजिने.
ओळख आपल्या डोळ्यांची

172 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad