Bluepad | Bluepad
Bluepad
तणावामुळे ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना, वेळीच घ्या काळजी
रवि जवंजाळ सर  , सांगोला. जि.सोलापूर.
रवि जवंजाळ सर , सांगोला. जि.सोलापूर.
22nd Nov, 2022

Share

तणावामुळे ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना, वेळीच घ्या काळजी
🏜https://www.bluepad.in/profile?id=245034
🏜https://youtube.com/channel/UCOOFSJ-vqS-YLl1Xa0gz9aw
🏜https://ravindrajavanjal1968.wordpress.com
तणावामुळे ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना, वेळीच घ्या काळजी
तणाव
आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन असतंच. पण त्याबद्दल खूप विचार केला की टेन्शन वाढतं. खरं तर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या मेंदूलाही विश्रांतीची गरज असते.
, 22 नोव्हेंबर : आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन असतंच. पण त्याबद्दल खूप विचार केला की टेन्शन वाढतं. खरं तर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या मेंदूलाही विश्रांतीची गरज असते. जेव्हा मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर समस्या सोडवण्यापासून थकतात, तेव्हा ताण, डोकेदुखी आणि चिडचिड या लक्षणांच्या रूपात त्याचे परिणाम दिसून येतात. आपल्या तणावाचं कारण मानसिक असलं, तरी त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. मेंदू आपल्या शरीरात मास्टर कॉम्प्युटरप्रमाणे काम करतो. पण हा मेंदूच थकला असेल तर आपल्याला अनेक समस्या जाणवतात. काही समस्या तर गंभीरही असू शकतात. त्या समस्या कोणत्या आहेत, याबद्दल जाणून घेऊयात. या संदर्भात ‘जागरण डॉट कॉम’ने वृत्त दिलंय.
1. निद्रानाश
तणावाचा पहिला परिणाम माणसाच्या झोपेवर होतो. जेव्हा तणावाशी लढण्यासाठी मेंदूतील सिंपथॅटिक नर्व्ह ट्रान्समीटर जास्त सक्रिय होतात, तेव्हा त्या व्यक्तीला निद्रानाशाची समस्या जाणवते.
2. सर्दी, खोकला व ताप
जे लोक जास्त अस्वस्थ असतात, त्यांच्या मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर तणावाशी लढून कमकुवत होतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. परिणामी त्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या वारंवार त्रास देतात.
3. हाय ब्लड प्रेशर
तणावामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे रक्तप्रवाह वाढतो, त्याचा परिणाम होऊन ब्लड प्रेशरही वाढतं. ब्लड प्रेशर वाढणं ही शरीरासाठी चांगली गोष्ट नाही. या समस्येवर योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास ती हृदयविकारासारख्या गंभीर समस्येचे कारण बनते.
हेही वाचा - Peanut Or Almond Butter : पीनट बटर की आल्मन्ड बटर, कोणतं बटर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर
4. डायबेटिस
तणावामुळे शरीरातील साखरेचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करणाऱ्या हॉर्मोन इन्शुलिनच्या सिक्रिशनमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायबेटिस होतो.
5. श्वसनासंबंधित समस्या उद्भवतात
तणावाच्या स्थितीत श्वासोच्छवासाची गती खूप वाढते. त्यामुळे व्यक्तीमध्ये अस्थमासारखी लक्षणं दिसून येतात. जर एखाद्याला आधीच हा आजार असेल तर तणावामुळे तो आणखी वाढतो आणि त्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात.
6. मायग्रेन
जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, तेव्हा मेंदूला जुळवून घेण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे व्यक्तीवर ताण येतो. तणावाचा सामना करण्यासाठी मेंदूमधून विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा स्राव होतो आणि त्यामुळे त्याच्या नसा संकुचित होतात. परिणामी, एखाद्या व्यक्तीला तात्पुरती पण तीव्र डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या समस्या होऊ शकतात.
7. स्पाँडिलायटिस
तणावामुळे स्पाँडिलायटिस होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावग्रस्त असते तेव्हा तिच्या मानेचे आणि खांद्याचे स्नायू अखडतात आणि त्यामुळे तीव्र वेदना होतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तीला मळमळ आणि उलट्या यासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
8. पचनासंबंधित समस्या
जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावाखाली असते, तेव्हा प्रतिक्रिया म्हणून आतड्यांमधून हायड्रोक्लोरिक अॅसिडचा स्राव असंतुलित पद्धतीने होऊ लागतो. अशा परिस्थितीत लोकांना आयबीएसची (इरिटेटिंग बाउल सिंड्रोम) समस्या उद्भवते. त्याची लक्षणं पोटदुखी, अपचन, लूज मोशन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांच्या रूपात दिसतात.
9. ओबेसिटी
तणावाच्या परिस्थितीत लोक वारंवार फ्रीज उघडतात आणि चॉकलेट, पेस्ट्री आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स यांसारख्या हानिकारक पदार्थांचे सेवन करू लागतात, त्यामुळे त्यांचे वजन वाढतं. वाढलेलं वजन हेही अनेक आजारांचं कारणं ठरतं.
10. त्वचेसंबंधित समस्या
यूएसमधील यूनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती जास्त चिंतेत असते तेव्हा तिच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन कोर्टिसोलचा स्राव वाढतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला त्वचेवर जळजळ होऊ शकते. यापासून बजाव करण्यासाठी, हा हॉर्मोन त्वचेच्या फॅट ग्लँड्सला अँटि-इन्फ्लामेट्री ऑईल स्राव करण्यासाठी सूचना करतो. यामुळे तणावाच्या स्थितीत लोकांना अॅक्ने आणि स्कीन अॅलर्जी सारख्या समस्या होतात.
11. स्मृतिभ्रंश
तणावामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा तिच्या मेंदूत आठवणी साठवल्या जात नाहीत. त्यामुळे ती व्यक्ती दैनंदिन कामातील महत्त्वाच्या गोष्टी विसरायला लागते.
12. प्रजनन प्रणालीवर परिणाम
तणावामुळे माणसाच्या शरीरात हॉर्मोनल असंतुलन निर्माण होते. यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, पुरुषांमध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि रोमान्सची इच्छा न होणं, या समस्याही निर्माण होतात.
तणावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

188 

Share


रवि जवंजाळ सर  , सांगोला. जि.सोलापूर.
Written by
रवि जवंजाळ सर , सांगोला. जि.सोलापूर.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad