Bluepad | Bluepad
Bluepad
सवय मनाची मोडली ग
Tokade Shriram
Tokade Shriram
22nd Nov, 2022

Share

सवय मनाची मोडली ग
किती ओतला जीव तुझ्यात मी
गुंतून गेलो सारा ग
इथे तिथे दिसेना
न लागे जीवाला थारा ग
कित्येक धारा पडल्या खाली
कित्येक डबके साचले ग
थेंबात दिसला चेहरा तुझा
अन डबके सुद्धा हसले ग
झरझर झरझर तुझी पाऊले
वाऱ्या सवेत पळती ग
त्या सोबत उडणारे तुषार
अजून मला छळती ग
ऊन आला पाऊस गेला
तुझा अबोला झाला ग
कोण कुठला आला तो अन
तुला कुंकू लावूनी गेला ग
तुझ्या अंगाला हळद चढली
डोईवर अक्षदा पडली ग
खरं सांगतो तुला एकदा
कविता माझी रडली ग
तुला पडावा प्रश्न कदाचित
का?आठवण नाही काढली ग
सुख लाभावे तुझ्या संसारी
म्हणून सवय मनाची मोडली ग
सवय मनाची मोडली ग
तोकडे श्रीराम

163 

Share


Tokade Shriram
Written by
Tokade Shriram

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad