Bluepad | Bluepad
Bluepad
"🌹बायको_सूंदर_मैत्रीण_असते🌹”
सचिन निर्मला लक्ष्मणराव देऊळकर
सचिन निर्मला लक्ष्मणराव देऊळकर
22nd Nov, 2022

Share

*_बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे गणित जमलं की संसार सुखी होतो..._* बायको_सूंदर_मैत्रीण असते”
पारिजातकाचा सुवास बायको असते, निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते, नवऱ्याची प्रेरणा बायको असते, जीवनाची अर्धांगिणी बायको असते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
"🌹बायको_सूंदर_मैत्रीण_असते🌹”
सासूसासऱ्यास आई वडील मानते, नवऱ्यात परमेश्वर पहाते, सारे आयुष्य सासरसाठी वाहते, संसारात स्वतःलाही विसरते. बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते.
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा, तरी ती धीराने सामोरी जाते, नवय्राच्या सुख दुःखात साथ देते, घराची ती तुळस होते. बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते.
कधी हसते, कधी रुसते, कधी उगाच रागानी पहाते, कधी आसवांच्या सागरात, नवऱ्यासोबत भिजते, कधी सुखाचे चांदणं टिपते, खरंच बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते, सासरचे गुण जगभर गाते, बायकोच सांभाळते सर्व नाते, घराचं स्वर्ग तिच करते, मनातील दुरावे तिच संपवते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते, मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?, संसारास तीच्या अमूल्य मानते, प्रत्येक जन्म ह्याच संसारासाठी मागते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते.
तिच्या मनात साऱ्यांसाठी आपुलकी असते, सुखी संसाराचे ती मनोरे रचते, माहेरी सोडून परक्या दारी येते, सासरला ती आपले करते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
कधी नवऱ्या साठी साज शृंगारात सजते, अबोलीचा गजरा केसात माळते, आरश्यास घडी घडी सूंदर असल्याची साक्ष मागते, नवर्याच्या एका स्पर्शानेच ती मोहरते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
नवऱ्यास गुण दोषा सोबत स्वीकारते, पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कोडे तिच सोडवते, थोड्या मायेची अपेक्षा ती ठेवते , नवऱ्याचा डोळ्यात केवळ प्रेम शोधते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
नवऱ्याचे नवरापण तिच सोसते, मनात दुःख लपवून जगासमोर हसते, तिची किंमत त्याला तेव्हाच कळते, जेव्हा ती त्याच्या सोबत नसते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
बायको तर मैत्रीण होऊन जाते, पण नवरा कधी मित्र होत नाही?, का नवऱ्या बायकोच्या नात्याला, तो मैत्रीचे नाव देत नाही?, पण बायको ह्या नात्यातील मैत्रीला असचं जपते, कारण बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते, मुलगी बहीण सून आई ची ती सर्व पात्रे साकारते, नवऱ्यासाठी मात्र बायकोच्या पात्रातून मैत्रीण होते, पण नवरा कधी नवरापण का सोडत नाही?, तिच्या सारखे तो तिचा मित्र का होत नाही?, त्याला का ते उमजत नसते ,
बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते, हातात हात घेऊन तिच्या सोबत चालावे, तिच्या सहवासात त्यानेही फुलावे, तिच्या आसमंत प्रेमात त्यानेही झुलावे, तिच्या सारखे प्रेम मग त्यानेही करावे , इतकेचं स्वप्न ती बघते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
एक दिवस नवरापण सोडून द्यावा, एक दिवस का होईना तिचा मित्र बनून पाहावा, मग कळेल प्रत्येक क्षण आहे नवा, तिच्या सोबत हा क्षण असाच राहायला हवा, प्रेमात मग त्याच्या ती नव्याने पडेल, आणि मग ती बायको बायको नसेल ,
त्याचीच सुंदर मैत्रिण झालेली असेल.🙂🙏

185 

Share


सचिन निर्मला लक्ष्मणराव देऊळकर
Written by
सचिन निर्मला लक्ष्मणराव देऊळकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad