Bluepad | Bluepad
Bluepad
शतजन्मीचे नाते जुळले
श्री गुंजन हरी देव
श्री गुंजन हरी देव
22nd Nov, 2022

Share

लिव इन रिलेशनशिप... अर्थातच युज अँड थ्रो संस्कृतीचा एक भाग जाणवतो.  एखाद्या गोष्टीची आपल्याला जोपर्यंत उपयुक्तता जाणवते,  गरज जाणवते तोपर्यंत तिला महत्त्व देणे अशा स्वार्थातून निर्माण झालेली संस्कृती.
तिथे फक्त माझी गरज, माझा स्वार्थ महत्त्वाचा आहे. परस्पर विश्वास, त्याग याच्या आधारावर निर्माण झालेले संबंध कायमस्वरूपी टिकणारे असतात.
लिव इन रिलेशनशिप संबंधांमध्ये केवळ स्वतःचा आणि स्वतःचाच विचार असतो. उथळ विचाराचे हे लोक केवळ चैन , स्वार्थ व स्वतःची गरज याच गोष्टींचा विचार करताना दिसतात. यामध्ये आपल्या अवतीभवती चा समाज, आपले कुटुंब, त्यांच्या भावना याला फार थारा नाही.
ज्याला स्वतःच्या कुटुंबाचा विश्वास, मित्र परिवाराचा विश्वास संपादन करता येत नाही असे लोक रिलेशनशिप किंवा परस्पर संबंध याविषयी किती सजग असतील याविषयी शंका वाटते. तसेच ज्याला कुटुंबाचा मित्र परिवारावर विश्वास असतो  त्याला अशा उथळ आधाराची गरज भासत नाही.
नातेसंबंध हे दुकानातल्या वस्तू प्रमाणे नाही. म्हणजे दोन दिवस वस्तू आणली वापरून बघितले आणि पसंत नाही पडली तर परत केली हे फक्त वस्तूच्या बाबतीत चालू शकते. कारण मुळात कितीही प्रयत्न केला तरी दोन भिन्न व्यक्ती या या विचाराने व शरीराने भिन्न असतात. त्यांची मते 100% कधी  जुळू शकत नाहीत. त्यामुळे एकमेकांबरोबर जुळवून घेण्याची कला आत्मसात असेल तर सहजीवन सहजशक्य होते.
सवडीनुसार व सोयीनुसार स्वीकारलेले सहजीवन म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप. आणि समर्पणाच्या भावनेतून स्वीकारलेले स्नेहपूर्ण सहजीवन म्हणजे विवाह संस्था.
संपूर्ण जग तुझ्याविरुद्ध गेले तरी चालेल परंतु मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर असेन, भले तू चूक किंवा बरोबर असशील अशी दिलेली खात्री म्हणजे विवाह संस्था. आणि आणि तू माझा मनाप्रमाणे वागशील तोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे असे कंत्राट म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप.
उगवत्या दिनकराला सर्वजणच नमस्कार करतात. तसेच जोपर्यंत तुमचे वैभव आहे, आरोग्य आहे, तारुण्य आहे तोपर्यंत अशी दिखाऊ नाती टिकतील. परंतु जेव्हा हे सर्व ओसरेल तेव्हा हृदयापासून प्रेम करणारे लोकच तुमच्या सोबत असतील.
आजकाल एखादी वस्तू येताना सुद्धा आपण लाईफ टाईम वारंटी, गॅरेंटी अशा अपेक्षा करतो. आणि जोडीदाराविषयी मात्र असा खुजा विचार लोक का करतात?
व्यवस्थापनामध्ये तुम्ही जेवढे जास्त जबाबदारी घ्यायला तेवढे तुम्हाला मिळणारे रिटर्न्स जास्त असतात. तुम्हाला मिळणारा सन्मान नाही तुम्ही जास्त जबाबदारी स्वीकारण्यास फार मोठा असतो. मग  जोडीदार एकमेकांची जबाबदारी घ्यायला नको म्हणून लिव्ह रिलेशनशिप समर्थन करतात ही गोष्ट न पटणारी आहे.
कोणत्याही गोष्टीला शास्त्रीय आधार असतो.आणि अशा गोष्टी एखाद्या सूत्रात बांधलेल्या असतात. अनेकांनी अनेक पद्धतीने पडताळणी केल्यावर मग ती गोष्ट सिद्धांत म्हणून मान्य होते. आणि अशाप्रकारे हजारोंनी मान्य केली गोष्ट समाजमान्य होते. अशा विचारांनी देखील आपली कुटुंब व्यवस्था ही  परिपूर्ण रचना आहे. केवळ व्यक्तीसाठी नाही, कुटुंबासाठी नाही तर निरोगी समाजासाठी ही रचना अत्यंत उपयुक्त आहे. आमचे कुटुंब ही आमची ताकद आहे. संपूर्ण जगामध्ये भारताचे हे एक वैशिष्ट्य आहे.
उत्तम भव्य ते घ्यावे
मिळमिळीत अवघे टाकावे....
यानुसार परकीयांचे देखील चांगले गुण घ्यायला हरकत नाही.. परंतु सोने सोडून लोखंडा पाठीमागे जाणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जोपर्यंत  आपली कुटुंब व्यवस्था टिकून आहे तोपर्यंत आपला समाज, राष्ट्र याला धक्का लावण्याची हिंमत  जगात कोणीही करू शकत नाही.
श्री गुंजन हरी देव
सातारा
9890590495

173 

Share


श्री गुंजन हरी देव
Written by
श्री गुंजन हरी देव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad