Bluepad | Bluepad
Bluepad
Title

yashu kadam
yashu kadam
22nd Nov, 2022

Share

तुम्ही ऐकले असेल की 30 /40 या वयातील स्त्रिया खूप सुंदर दिसत असतात आणि हे खरंच आहे....
किती अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना हा फरक लक्षात आला..? मला माहित आहे कदाचित 3/4 सोडल्या तर कोणीच नाही
वेड्या आहोत आपण.... आपल्याला मुळात " जीवन जगण्याची कलाच येत नाही" आपण आपले मुलं, नवरा, संसार यात इतके गुरफटून जातो की., स्वतःकडे लक्षच देत नाही.....!
मुलं मोठी झाली.... लोकं काय म्हणतील हा काय म्हणेल किंवा ते काय म्हणतील असा विचार करत बसतो कुढत....
नंतर आपल्याला वाटतं की आता मी खूप म्हातारे झाले आता या गोष्टी आपल्याला शोभणार नाहीत......
अगं....! जेव्हा मन मारलस...., ज्यांच्यासाठी या घरात आली., त्यांनी तरी तुझा विचार केला का कधी..?
जेथे जन्म घेतला तिथे वीतभर जागा मिळत नाही.. ज्यांच्यासाठी सगळं सोडून आलीस त्या घरात तर कायम संघर्ष करावा लागतो.., आहे कुणाच्या नावावर एक गुंठा जमीन.. शेवटी स्त्रीचं कुणी कवतुक करणे शक्यच नाही.., जगात एकच स्त्री आणि पुरुष म्हणजे आई आणि बाबा... पण येथेही हक्क गाजवला तर लागलीच परके....,
आणि का करायची कुणा कडून अपेक्षा., पोटची पोरं सुध्दा वेळेला आपली नसतात.... कर्तव्याला कुठे चुकायचे नाही., पण स्वतःचे जगणे मात्र सोडायचे नाही...!
जगत राहायचं हसून., दुःख आपले दाखवायचे नाही.., समजून घेणारं कमी असतात..., ही खूण बांधायची मनात..! सगळे म्हणतात तूच आहे राणी घराची पण म्हणून तुला कोणी मालकीण बनवत नाही.... दे सोडून सर्व भूतकाळ तुलाच होईल त्रास वर्तमान काळात जग तू नंतर मात्र मुलं सूना नातवंडं जावई... यात कशा शोभून दिसतील आजीबाई...!
काही स्त्रिया घरातच बसायचय म्हणून स्वतःचा अवतार बिघडलेला विस्कटलेला का ठेवतात...? मुलं नाही जवळ म्हणून शिळे पाके खातात.., पोष्टिक आहाराची तुला आहे गरज., सकाळी उठल्यावर आरशात पाहायचे स्वतःकडे पाहून स्मित हास्य करायचे., "किती छान दिसते" म्हणून केसातून फिरवायचा हात.. तू आहे म्हणून तुझा संसार आहे छान..! स्वतःच्या पाठीवर स्वतःच मारायची थाप...!
म्हणून म्हणते तुम्ही आधी स्वतःची इज्जत करा कवतुक करा., स्वतःला मान द्या..! स्वतःला सर्वस्व समजा., जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हा तू अजून दहा वर्षे तरुण दिसशील...
"प्रिय सखी आयुष्य जगून घे"
जे काय वाईट होईल त्याला लाव कडी..,
वर्तमानात जग जरा मजा घे थोडी....!
संकट येत राहतील घाबरून नको जाऊ..,
कोणत्याही गोष्टीचा करू नकोस बाऊ..!
भिऊन तर रोजच जगतेस जरा मोकळा श्वास घे..,
मित्र मैत्रीण जवळ कर कामात रजा घे...!
चौकटीत राहून राहून कंटाळा येणारच..,
चार चौघात बसल्यावर दुःख पळून जाणारच..!
स्त्री झाली म्हणून काय तिला मन नसतं का..?
गुलाबी, लाल रंगाशी तिचं काही वाकड असतं का..?
शेजारीण मैत्रिणींनी एकत्र आल पाहिजे..,
गप्पांनी कसं मन चिंब झालं पाहिजे...!
मोठं झाल्या नंतर सुध्दा लहान होता येतं..,
मुखवटा न घालता आयुष्य जगता येत..!
गप्पा मार., जोक सांग अगदी खळखळून हास..,
अर्धी भाकर जास्त खा म्हणू नको बास..!
मन मोकळं जगल्यान, ब्लडप्रेशर होत कमी..,
अटॅक वैगरे येणार नाही याची देते हमी...!
गप्पातल्या Insulin ने शुगर कमी होते..,
रुद्यातील ठोक्यांची

0 

Share


yashu kadam
Written by
yashu kadam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad