Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
22nd Nov, 2022

Share

शुभ मंगळवार .
गेट टुगेदर ही संकल्पना सध्या जोरात सुरु आहे .
शाळा - कॉलेज - नोकरी सगळ्यांचे गेट टुगेदर मस्त जोमात होतं असतं .
त्यामुळे , मनात आलं ,
पु .लं . च्या व्यक्ती आणि वल्ली यांचं गेट टुगेदर झालं तर काय काय होईल :
बापु काणे :
"मी जन्मजात सेक्रेटरी आहे . मी घेतो गेट टुगेदर ची जबाबदारी .
नाथा कामत :
" ह्या गेट टुगेदर चा पार्ल्यातील तरूणींचा संपूर्ण खर्च मी करेन . ह्याची सुचना शितू सरमळकरांच्या दुकानात मी स्वतः लावीनं . "
सखाराम गटणे :
कार्यक्रमाच्या सुरूवातीच निवेदन गटणे करेल . तसेच वर्तमानपत्रात द्यायची बातमी देखील .
नंदा प्रधान :
" इंदु येणार असेल तर मी परदेशातून ही स्वखर्चाने येईन ."
नारायण :
प्लास्टिकच्या चमच्या पासून ते जेवणा नंतरच्या मसाला पाना पर्यंत ची जबाबदारी नारायणकडे चं असेल .
अंतु बर्वा :
यांचं येणं नक्की नाही .
" आमच्या कोकणात हे गेट टुगेदर चं फॅड अजून पोचलं नाही . समोरून येणारा माणुस ढुंकूनही बघत नाही . कसलं गेट टुगेदर करताय ? "
नामु परीट :
" गेट टुगेदर ला आलेल्या सगळ्यांचे सगळे कपडे धुऊन देण्याची जबाबदारी मी घेतो ."
थोडक्यात पुढची अनेक वर्षे नामु यांचे कपडे वापरणार .
बबडू :
" घोसाळकर मास्तर असतांना हे गेट टुगेदर व्हायला पाहिजे होतं . गेट टुगेदर च्या जेवणात बेसन लाडू हेच पक्वान्न पाहिजे स्कालर ! "
हरितात्या :
" होऊन जाऊ दे हे गेट टुगेदर , मला बरं पडेल , पुराव्यानं शाबीत करीन ! "
चितळे मास्तर :
" काकू ..... वांदरं आली गो . टाईम्स हॅव चेंज्ड . करूयात झक्कास गेट टुगेदर . आमंत्रण पत्रिकेत एका ओळीत आठ चं शब्द तेवढे ठेवा . "
पेस्तन काका या परिवारात उशिरा सामिल झाले होते म्हणून त्यांना निमंत्रण पाठवले गेले नाही .
त्यांना हे कळलं . ते एवढचं म्हणाले ,
" गॉड इज सफरिंग " !
आपल्या सगळ्यांना ही मनापासून विनंती , जमेल आणि आवडेल का या गेट टुगेदरला यायला ?
विश्वास बीडकर .
२२ नोव्हेंबर २०२२ .

180 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad