Bluepad | Bluepad
Bluepad
आत्मविश्वास म्हणजे काय?
Mukul Malkar
Mukul Malkar
22nd Nov, 2022

Share

तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे असे स्वतःला वाटणे म्हणजे आत्मविश्वास. अगदी सोप्या भाषेत स्वतःला स्वतःबद्दल असणारा विश्वासा, आपल्या अस्मितेचा, अभिमानाची जाणीव म्हणजे आत्मविश्वासाला. हा आपल्या जीवनात यश अपयश निश्चित करणारा घटक आहे. आपले मूळ आपले सामर्थ्य याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपला आत्मविश्वास उंचावत असतो. काही प्रसंगी आपल्याला माणसाचे वागणं विचित्र वाटतं. एखाद्या सेल्समन एखाद्या ग्राहकाला साहेब आपल्याला काय जेऊ? असं विचारतो तर दुसऱ्या ग्राहकाला किंमत देत नाही. एखादी व्यक्ती अमुक एका माणसाशी चांगल्या वागते तर तीच व्यक्ती दुसऱ्या माणसांशी उद्धटपणे वागते याचं तुम्ही निरीक्षण केला आहे की? तुमच्या आजूबाजूला काही घटना घडत अस्तात. काही लोकांना अरे तुरे या भाषेत सुद्धा वागणूक मिळत असते पण काही लोकांना सन्मानाची, आदराची वागणूक मिळते.याचा नीट अभ्यास करा अशा लोकांकडे इतरांच्याकडून आदराची वागणूक मिळावी असा रुबाब आणि जरब असते थोडक्यात सांगायचं झाले तर त्यांना इतरांच्या कडून सगळ्यात जास्त सन्मान आणि आदर असतो असे लोक यशस्वी होतात. आपण आपल्याकडे ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने इतरही लोक पाहत असतात. आपण जे काही करत असतो त्यामधून आपल्या आत्मसन्मान डोकावत असतो. आपल्याला जे स्वयं मूल्यमापन असतं ते आपण इतरांच्या पर्यंत पोहोचवतो आणि त्यानुसार आपल्याला प्रतिसाद मिळतो.

178 

Share


Mukul Malkar
Written by
Mukul Malkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad