Bluepad | Bluepad
Bluepad
चुकीच्या सवयी कमी झाल्या कि निद्रा नाश आपोआप संपुष्टात येईल
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
22nd Nov, 2022

Share

*चुकीच्या सवयी कमी झाल्या कि निद्रा नाश आपोआप संपुष्टात येईल*
निश्चिंत आणि शांत झोप हि प्रत्येक मानवी शरिराची अत्यावश्यक गरज असते . आपल्याला शांत झोप लागली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते. परंतु हि बाब सहजासहजी फार कोणीही गंभीरपणे घेत नाही.बालपणी जेव्हा आपण निरागस बालक असतो. तोपर्यंत आपण निश्चिंत शांत झोपतो. ‌पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं एक एक नवं नवीन जबाबदारी आपल्यावर येऊन पडते . जबाबदारी येताना अनेक वेगवेगळ्या अडचणी समस्या घेऊन येते . आणि मग इथुनच आपली झोप गडबडते. आपल्यावर आलेली जबाबदारी आणि त्याच दरम्यान आपण कळत न कळत काही चुकीच्या सवयी लावून घेतो. आणि याचा आपल्या झोपीवर पण अनुकूल प्रतिकुल असा विपरीत परिणाम होतो. जबाबदारी आणि अडचण समस्या याच दरम्यान आपण मजबूत होऊन स्थिर होण्याची आवश्यकता असते.पण असं शक्यतो होत नाही . चांगल्या सवयी ह्या लागण्यासाठी कठिण वाटता कटु वाटतात . चांगल्या सवयीचं अनुकरण शक्यतो कोणीही सहजासहजी करत नाही.पण आपल्या आरोग्यावर तसेच जीवनावर प्रतिकुल परिणाम करणार्या सवयी मात्र आपण सहजगत्या अंगिकारतो हि किती आश्चर्यकारक बाब आहे पण सत्य आहे. जेव्हा चांगल्या सवयी आपण अंगिकारतो तेव्हा मात्र आपण सदैव चैतन्यशील , शांत, संयमी, स्थिर, परिपक्व मजबूत जाणवतो . आणि आपल्याला झोप पण शांत लागते .पण जेव्हा आपण गोष्टी अंगिकारतो तेव्हा ,आपण अस्थिर, बैचेन,गोंधळलेले,चंचल, आणि अपरिपक्व जाणवतो . आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊन आपली झोप गडबडते, म्हणजे आपली झोप उडते त्याला आपण निद्रा नाश म्हणतो. निद्रा नाश हा एक प्रकारचा घातक आणि विचित्र आणि आपण आपल्या चुकीमुळे निर्माण केलेला जटिल आजार आहे .या आजारांचा आपल्या जीवनात प्रवेश झाला कि मग मात्र आपलं सगळं नियोजन बिघडत . आणि आपलं जीवन पण प्रभावित होत म्हणून हा प्रभाव वेळीच रोखण्यासाठी आपण आपल्या जीवनात चांगल्या वाईट सवयी वर लक्ष्य ठेवले पाहिजे . चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत तर चुकीच्या सवयी शक्यतो . आपल्या संपर्कात पण येणार नाहीत हि दक्षता घेतली पाहिजे आणि जरी कळत न कळत चुकीच्या सवयी लागल्या तरी त्या हळूहळू कमी करत करत त्यावर नियंत्रण प्रस्थापित केले पाहिजे. जेणेकरून आपल्या जीवनात होणारे वाईट परिणाम थांबतील .तसं पाहिलं तर बदलती जीवनशैली व आधुनिक समाज व्यवस्था याचे हि परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी काही वाईट सवयी ह्या आपल्या वळणी पडतातच .पण त्या मध्ये आपण अडकून न पडता वेळीच जागृत झाल पाहिजे. आणि आपण वेळीच जागृत नाही झालो तर मग आपल्या शरिरावर आरोग्यावर दुरगामी परिणाम होऊन आपल्याला निद्रा नाश हि लक्षण दिसु लागतील. हल्ली झोप न येणे हिच खरी खुप मोठी घातक समस्या सर्वत्र दिसत आहे . अनेक लोक झोपलागावी म्हणून झोपेची गोळी खातात किंवा आणखी काही प्रकार करतात .त्या मध्ये नशा हा पण एक प्रकार आहेच .पण हे सगळं प्रचंड घातक अहितकारक हानिकारक आहे.मानवी शरिराला झोप येणं थकवा येण हे नैसर्गिक आहे. परंतु आपल्याला थकवा आल्यानंतर सुद्धा झोप का येत नाही तर आपण अशा काही काही चुकीच्या सवयी आपल्याला लावुन घेतल्या आहेत कि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर व पर्यायाने झोपीवर होणारच . मानवी शरीर थकल्या नंतर त्याला विश्रांती हि आवश्यक असते . आणि विश्रांती घेतल्याशिवाय पुन्हा चैतन्य निर्माण होत नाही .पण हि विश्रांती घेत असताना अनेकांना झोप लागत नाही .किंवा मध्येच जाग येते किंवा झोप पूर्ण होत नाही.पण मग नेमकं असं का होतं आपली निद्रा नाश का होतेय .हे वेळीच शोधल गेलं पाहिजे जेणेकरून त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर व भविष्यावर होणार नाहीत . कठिण जटिल असणार्या निद्रा नाश या सारख्या गंभीर आशा आजारांपासून सुटका होईल .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

176 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad