Bluepad | Bluepad
Bluepad
ओढ माहेरची
g
gayatri rajaram mane
22nd Nov, 2022

Share

माहेरची ओढ काही निराळीच असते ,एकदा का उंबरठ्याच्या आत पाय ठेवला की घर तर सोडू वाटतच नाही पण आतुरतेने वाट पाहत बसलेले आणि पाणावलेले डोळे देखील पाहू वाटत नाही.मायेची उब आणि आनंदाचं चांदण फुलवणार एकमेव ठिकाण असतं "माहेर".ज्या दिवशी सासरी जायचा दिवस उजाडतो तेंव्हा ढसा ढसा रडणारा बाप दिसतो. लहानपणा पासून सगळे हट्ट पुरवणाऱ्या हात 500 रुपयाची नोट थरथरत्या हाताने देतो,तेंव्हा कळतं आई बापापासून लांब राहणं काय असतं.... बाप श्रीमंत असो वा गरीब लेकीच्या आयुष्याची झोळी आनंदानेच भरतो .
आज माहेर सोडताना हसत हसत सोडलं, आणि बस मध्ये बसल्यावर हसण्या मागची नदी दोन्ही डोळ्यातून ओसंडुन वाहू लागली. जगण्याची परिभाषा समजून देऊन आत्मविश्वासाने आयुष्य जगायला लावणारी बापासारखी ताकत मागे सोडताना खूप त्रास होत होता. कधी कधी अस वाटतं की परत एकदा लहान होऊन ,बापाच्या खांद्यावरून दिसणार जग पाहावं,आणि दिसणाऱ्या त्या मोठ्या जगात फक्त आई बापाचंच होऊन राहावं,हट्ट करावा चॉकलेट साठी आणि त्या 1 रुपया साठी ,ज्या 1 रुपयाने सगळी स्वप्न पूर्ण होतील,असं स्वप्न पाहणाऱ्या मनासाठी.लेक होणं खूप अवघड असतं अस मला वाटायचं आज कळालं बाप होणं त्याहून खूप अवघड आहे ....😌

168 

Share


g
Written by
gayatri rajaram mane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad