Bluepad | Bluepad
Bluepad
तु म्ही असता तर 🌹🌹🌹🌹
sulbha wagh
sulbha wagh
21st Nov, 2022

Share

दुर दुर फिरायला जायच. आधी अष्टविनायक करायय च या वयात , नाही करायची साठी त जास्त दगदग | आयुष्य भर ऊन पावसा चे खेळ खेळलो . मुलां साठी पाळणा घर ,पाया पडणी ,शिप्ट ड्युटि ची अँडजेस्ट मेंट ,काय काय नाही केल ,सगळी नाती जपताना डोळ्यात ल्या आसवां ना पापण्या तुन बाहेर पडु दिलं नाही |किती झाला त्रास तरी मना तल आवंढे ह्दयात च साठविले ,जीवा पाड कष्ट केले सर्वीं साठी , सर्वांना खुष ठेवलत | प्रतिकुल परिस्थिती तील घटनां ना तोंड देता देता ह्रदया च्या आजारा ने ग्रासलं | नि माझ्या सुखी संसाराचं नशीब मला च हसलं | बोलला होतात मला ,आता दोन पैकी कुठल्या एका नातवडा ला सांभळ ,लहान मुल आवडतात ना तुला |आठवड्या दोन दिवस ,बायको आराम करायचा |दोन दिवस कुठुन जेवण आणायचे ती ठिकाण मला दाखविली |तुझी अपुर्ण राहिलेला लिखाणा चा छद आता निवांत जोपास बरं |हव तर स्वयंपाका ला ही बाई ठेवु | एकमेकां च्या साथी ने खुप छान वार्ध्याक्य व्यतीत करायच होत आपल्या ला | पण माझ्या आधी माझा नटसम्राट पालखी त जाऊन बसला | जेवढे हळवे तेवढे तापट होता , पण कर्तव्या त चोख , आळस माहित नव्हता कधी | माझ हे गुलाबा च फुल सदा टवटवीत . वक्तशीर पणा ,पैसे वापरण्या चे चोख नियोजन | त्यामुळे अगदी भाऊ बहिण भाचवंड तुमचे माझे ,सर्वांच करून ही पैसा अपुरा पडला च नाही | तुर्ता स एवढ च हितगुज पुरे तुमच्या आत्म्या शी |नाही तर पापण्या तुन अश्रु ओघळतील ना ,ते तुम्हाला आवडणार नाही | खचु नको ,खंबीर रहा सांगुन गेलात ना |काल आपल्या कल्याण च्यी घरी गेले होते ,आठवणींना जाग आली . म्हणुन ह्रदया तील भावने च्या स्पंदना ना थोडंं लेखणी त उतरवलं इतकच | तुमच्या निवर्तना नतर सात वर्षा त तावुन सुलाखुन निघाले मी . जग आोळखायला शिकले आता| म्हणुन काळजी नका करु | तिथे जागा रिझर्व्ह करा माझ्या साठी | Good bye my flower of pink rose.सुलभा हनुमान वाघ 21,=11=2021
तु म्ही असता तर 🌹🌹🌹🌹

173 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad