Bluepad | Bluepad
Bluepad
श्रीकृष्णाची लीला भाग २
S
Shivani Patil
21st Nov, 2022

Share

एकदा दुर्योधनाच्या सांगण्यावरून शीघ्रकोपी महर्षी दुर्वास आपल्या दहा हजार शिष्यांसोबत वनवासात असलेल्या पांडवांकडे अतिथी म्हणून आले. भगवान भास्करांकडून महाराज युधिष्ठिरला असे एक अलौकिक पात्र मिळाले होते की, ज्याच्यात केलेला अन्नाने कितीही लोकांना पोटभर जेवण मिळू शकत असे. पण एकदा द्रौपदी जेवली की, मग मात्र मिळत नसे. त्या दिवशी दुर्वास मुनी नेमके अशावेळी आले की द्रोपदीचे जेवण झाले होते. अतिथी वत्सल धर्मात्मा युधिष्ठिराने मुनींना भोजनासाठी आमंत्रित केले. मुनी स्नान आणि नित्यकर्म करण्यासाठी गंगातीरी गेले. इकडे द्रौपदी चिंतेत पडली की, आता करावे काय? मोठे धर्मसंकट उभे राहिले आणि मनातल्या मनात ती आपल्या हितचिंतक आत्मीय श्रीकृष्णाचा धावा करू लागली. तसे कृष्ण लगेच धावत आले आणि म्हणाले, 'अग मला खूप भूक लागली आहे. मला लवकर काहीतरी खायला दे. द्रौपदीने सगळा वृत्तांत सांगितला आणि म्हणाली, 'आताच माझे जेवण झाले. आता पात्रात काहीच शिल्लक नाही. तसे श्रीकृष्ण म्हणाले, 'आण बरं ते पात्र इकडे मी पाहतो. द्रौपदीने पात्र कृष्णाला दिले. कृष्णाने पाहिले की, भांड्याच्या तोंडाशी भाजीचे एक पान चिकटलेले आहे. ते तोंडात टाकले आणि म्हटले, 'या भाजीच्या पानाने यज्ञभोक्ता विश्वात्मा भगवान श्रीहरी तृप्त होवो'. नंतर ते सहदेवाला म्हणाले की, 'जा आणि मुली जणांना भोजनासाठी घेऊन ये.' सहदेवाने गंगा किनारी जाऊन पाहिले तर तिथे कोणीच नाही. झाले असे की, जेव्हा श्रीकृष्णाने भाजीचे पान तोडना टाकून संकल्प म्हटला त्यावेळी मुनी पाण्यात उभे राहून अघमर्षण करत होते. त्यांना असे वाटले की, आपले पोट भरले आहे. एवढेच नव्हे तर अन्न अगदी गळ्याशी आले आहे. त्यांना वाटले की, आता पांडवांचा स्वयंपाक फुकट जाईल आणि आपण बांधवांचा क्रोध उडून घेऊ. त्यामुळे घाबरून ते चुपचाप पळून गेले. त्यांना माहित होते की, पांडव भागवत भक्त आहेत. शिवाय अंबरीशाकडे त्यांना जो अनुभव आला होता. तेव्हापासून ते भगवंताच्या भक्तांना घाबरत होते. सहदेव मुनींना गंगा किनारी न पाहून परत आला. अशा प्रकारे शरणागताबद्दल श्रीहरीने आपल्या आशीर्वादाने रक्षण केले. अशा प्रकारच्या चरित्रावरून श्रीकृष्णाची भगवत्ता आणि सर्व व्यापकता दिसून येते.

172 

Share


S
Written by
Shivani Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad