Bluepad | Bluepad
Bluepad
किस्सा पेट्रोल पंपचा..
simran zodape
simran zodape
21st Nov, 2022

Share

" किस्सा पेट्रोल पंपचा "
एक किस्सा पेट्रोल पंपचा आज तरी रात्री रात्री 'आठ' वाजता, पेट्रोल पंप ला गेली पण काय, तिथे खूप गर्दी होती, मग काय, परत मी जाऊ शकत नव्हते कारण गाडी मध्ये पेट्रोल नव्हते,आणि दुसरा दिवशी सकाळचे कॉलेज होते, त्यामुळे पेट्रोल आताच भरण्या शिवाय काही पर्याय नव्हता..
त्यामुळे गर्दी असून सुद्धा कशी बशी मी त्या गर्दीमध्ये गेले, तिथे गेल्या नंतर कळले की त्या गर्दीमध्ये असणाऱ्यांन पैकी मी एकच तिथे मुलगी होती, फक्त पेट्रोल देण्यारा काकू शिवाय, मी थोडी घाबरली आणि विचारात पण पडली,जावं की काय परत, गर्दीमध्ये राव की नाही...""असं म्हणनेच खुप सोपं असते की घाबरत तर नाही कोणाच्या बापाला""पण असं काय नाही,वेळ आली की सर्व कळतंय, आणि मी जसं जसं समोर जाऊ लागले तसं तसं काळजाचं ठोके वाढू लागले, आजुबाजुला जे काही लोक होते ते माझ्या कडे बघत असावे आणि आपसात बोलत असावेत असे जाणवले..
त्यात मी त्यांच्या जसं जसा आवाज येऊ लागला, तसं तसं मी हालचाल करू लागली, त्यातच मी 'स्कारप' पण नव्हतं बांधले चहेराला, कारण रात्री जायचं होतं आणि जवळचं जाणार होती तर, त्यामुळे या लोकं अजुन बघु लागले...""कितीही नाही म्हटलं तरी दुपट्टा हा मुलींच्या थोडं ना थोडं सुरक्षा करतोच""
मी जसं जसं समोर जाऊ लागले तसं तसं ते माणसं आणि मुलं बघून बोलू लागले..पाहू लागले तसं तसं माझ्या काळजाचं ठोके वाढू लागले " ते लोक असे बघू लागले की जणू काय मी स्टार असल्या सारखे", मला तसे जाणवू लागले, कस बसा माझा नंबर आला आणि मी पेट्रोल भरले आणि निघाले घरी.....
‌‌ पण मी विचार करू लागले,की मी मुलगी आहे,म्हणून आणि मी तिथे एक ती मुलगी होती म्हणून बघु लागले की काय, म्हणजे मला अशा पुष्कळ विचाराने खाऊन घेतले होतं,जो पर्यंत मी घरी गेली नाही , तो पर्यंत माझ्या डोक्यात तेच सुरू होते...
मग मी घरी आले जे झाले ते मम्मीला सांगू लागले,ती बघ बोलली आपल्या बाजूला असेच लोक राहत असतात बोलली, आत्ता या सर्व गोष्टींची तु सवय करून घे, कारण आता कामाला बाहेर जाशील तर तुला या असायचं मानसिकतेच्या लोकांशी राहावे लागेल, आणि छोट्या छोट्या गोष्टीला घाबरायचं नाही, खंबीर पने उभे राहून समोर जायचे....
माझं तेच होते, मुलीलाच का आम्ही कधीच असे मुलाकडे बघत नाही कधी त्यांना बघून बोलत नाही,मग का लोक असे बघतात आज देश इतका प्रगतीवर आहे तरी लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेला नाही.. एक काळ तो होता जेव्हा मुलीला शिक्षण घेण्याची ही परवानगी नव्हती आणि आज एक काळ आहे की तिचं मुलगी ही आज मुलांना शिकवणे, तरीही त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदला नाही...
चिऊ..🌿✍️

171 

Share


simran zodape
Written by
simran zodape

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad