Bluepad | Bluepad
Bluepad
तू भेटशील का ?
S
Saurabh Kulkarni
21st Nov, 2022

Share

रस्त्यावरून वाट शोधत जात होतो
तू भेटलीस
नजरेस नजर झाली,पुढचा मार्ग विचारला
तू खुणेनेच दाखवंलास
त्याच रस्त्यानं चालत राहिलो
पण पुन्हा रस्ता चुकलो
तुझ्या त्या एका नजरेनं स्वतःला हरवुन बसलो
परत फिरलो सैरावैरा धावत सुटलो
नजरेनं तुला शोधत राहिलो
वाटलं परत भेटशील का ..
तुझ्या हृदयात जागा देशील का ?
माहीत आहे गुलाबी हृदयाचा मार्ग काटेरी आहे
तो तुडवायची तयारी आहे
पण सांग न पुन्हा भेटशील का..
तुझ्या हृदयात जागा देशील का ?
वाट पहायची तयारी आहे
कारण निस्वार्थी प्रेमात
तू दिसणं नाही तर असणं महत्वाचं असत
तरीही एकदा सांग ना
पुन्हा भेटशील का..
तुझ्या हृदयात जागा देशील का ?
देशील का ??????
तू भेटशील का ?

172 

Share


S
Written by
Saurabh Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad