Bluepad | Bluepad
Bluepad
आम्ही जगायचं कसं ?
दीपक व्य.मोहिते
दीपक व्य.मोहिते
21st Nov, 2022

Share

दीपक मोहिते,
आम्ही जगायचं कसं ?
हल्लाबोल,
भातकापणी व झोडणीची कामे संपत आली आहेत.भात,गिरणीवर नेला की आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नसते.पुढील वर्षी पावसाच्या आगमनापर्यंत त्याच्यासमोर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसते.शेतमालकाकडून मिळालेली बिदागी व दोन पोती ( ४० ते ५० किलो ) भात,यावर त्याचे तीन ते चार महिने कसे बसे जातात.मिळालेल्या बिदागीतून तेल,डाळ,मसाले व इतर जिन्नस तो खरेदी करतो.मार्च ते जुलै असे ५ महिने त्याच्यासमोर कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा ठाकतो,आणि त्याची रोजगारासाठी वणवण सुरू होते.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र असेच सुरू आहे.मुलाबाळांचे शिक्षण,त्याच्या गरजा भागवणे त्याला होत नाही.सणासुदीला शेतमालक जे काही देतो,त्यावर सारं काही अवलंबून.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या आदिवासी शेतमजुरांच्या जीवनात पहाटेचा उष:काल कधीही दृष्टक्षेपात येऊ शकला नाही.
देशाच्या आर्थिक विकासात शेतीक्षेत्राला अनन्यसाधारण महत्व असल्याचा ढोल सतत वाजवण्यात येत असतो.परंतु शेतीक्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर आजही हलाखीचे जीवन जगत आहेत.त्यांना कोणी वाली नाही,आपल्या राज्याची ओळखच मुळी कृषिप्रधान राज्य,अशी आहे.पण वरील दोन्ही घटक स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर उपेक्षित जीवन जगत आहेत.एक सतत आत्महत्येच्या मार्गावर असतो,तर दुसरा पोटापाण्यासाठी कुटुंबासह वणवण फिरत असतो.वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे.बघता बघता ७५ वर्षे झाली,पण बदल होऊ शकला नाही.आजवरच्या एकाही सरकारने या ज्वलंत प्रश्नी संवेदना दाखवल्या नाहीत.
एकीकडे मायबाप सरकार लक्ष देईना तर दुसरीकडे निसर्गाची वक्रदृष्टी,त्यामुळे हे दोन्ही घटक आज विपन्नावस्थेत आहेत." आहे रे आणि नाही रे," अशा दोन वर्गात हे क्षेत्र विभागले
आम्ही जगायचं कसं ?
गेले आहे.प.महाराष्ट्र व उ.महाराष्ट्र हे दोन विभाग वगळता इतर चार विभागात कृषिक्षेत्राची अवस्था अत्यंत दयनीय आहे.उ.महाराष्ट्रात रब्बी पिके,फलोत्पादन व बागायती उत्पादने,यामुळे सुबत्ता आहे.मराठवाडा,विदर्भ व कोकण,हे तीन विभाग,या विषयी मागासलेलेच आहेत.पण एकाही सरकारला कृषीक्षेत्राला संजीवनी मिळावी,असे वाटत नाही.हे खऱ्या अर्थाने या राज्यातील शेतकरी व शेतमजुरांचे दुर्देव म्हणावे लागेल.

167 

Share


दीपक व्य.मोहिते
Written by
दीपक व्य.मोहिते

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad