Bluepad | Bluepad
Bluepad
अलौकिक दिव्य बँक
N
Nandkishor Dhekane
21st Nov, 2022

Share

*🙏"अलौकिक दिव्य बँक"👏 .....*
*मानवी बँकेप्रमाणे दुसरी एक अति महत्त्वाची बँक आहे व त्या बँकेला "दिव्य अदृश्य बँक" (Divine Bank) असे म्हणतात.* अशा तऱ्हेची दिव्य बँक अस्तित्वात आहे ह्याची काहीच जाणीव लोकांना नसते, मग ते अशिक्षित असोत किंवा सुशिक्षित असोत, मोठमोठ्या विद्वान व विज्ञाननिष्ठ लोकांना सुद्धा ह्या दिव्य बँकेचे ज्ञान नसते. *हे ''अज्ञान'' हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका होय.*
पैशासाठी, सत्तेसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माणसे वाटेल तशी वागतात किंवा वाटेल ते करतात. *ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या दिव्य बँकेसंबंधी त्यांचे असणारे प्रचंड अज्ञान हे होय.*
*ही दिव्य बँक अतिशय विलक्षण असून तिचे अस्तित्व प्रत्येक माणसाच्या हृदयात असते.* प्रत्येक माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्यांचे सूक्ष्म ठसे त्याच्या अंत:करणात उमटतात *व ते "पाप किंवा पुण्य" ह्या स्वरूपात "दिव्य बँकेत" जमा होतात.*
मानवी बँकेचे व्यवहार बहिर्मन जाणीवपूर्वक करते तर *ह्या दिव्य बँकेचे व्यवहार अंतर्मन नेणीवपूर्वक करीत असते.* मानवी बँकेत "पैसे" जमा करण्याचे किंवा त्या बँकेतून पैसे काढण्याचे काम आपले "बहिर्मन" करते, *त्याप्रमाणे दिव्य बँकेत "पाप-पुण्य" जमा करण्याचे व त्यांचा विनियोग करण्याचे कार्य "अंतर्मन" करीत असते.*
*माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्यांची प्रतिक्रिया निसर्गाच्या नियमानुसार आज ना उद्या घडणार हे निश्चित. ही प्रतिक्रिया "सुख किंवा दुःख" ह्या स्वरूपात माणसाच्या अनुभवाला येते.* सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच असे मात्र नाही. निरनिराळ्या जातीची झाडे वेगवेगळ्या कालांतराने माणसाला फळे देत असतात. काही झाडे दोन वर्षांनी किंवा पंधरा वर्षांनी फळे देतात, तर अक्रोडाचे झाड दिडशे वर्षांनी सुद्धा फळ देते.
अगदी त्याचप्रमाणे *माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करीत असतो, ती कर्मे निरनिराळ्या जातीची असून वेगवेगळ्या कालांतराने माणसाच्या जीवनात "सुख-दुःखाच्या" रूपाने फळास येतात.*
हा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल, ती ही की, *माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो ती प्रत्यक्षात सुख-दु:ख रूपाने अनुभवास येण्यापूर्वी ती मानवी जीवनात अव्यक्त स्वरूपात वास करून राहतात. ह्याचाच अर्थ असा की, माणूस जी शुभ किवा अशुभ कर्मे करतो ती प्रत्यक्षात फळाला येण्यापूर्वी त्याच्या अंतर्मनात "पाप-पुण्य" ह्या स्वरूपात वास करून राहतात व जीवनात "सुख-दुःख" रूपाने प्रत्यक्षात प्रगट होण्यासाठी "अनुकूल परिस्थितीची" वाट पाहत राहतात.*
*जेव्हां अनुकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हां अंतर्मनात वास करून राहिलेली ही "पाप-पुण्ये" प्रत्यक्षात साकार होऊन त्या माणसाला "सुख-दुःखाचे" भोग भोगायला लावतात.*
माणूस जी शुभ किवा अशुभ कर्मे करतो ती '‘पाप-पुण्य'' ह्या सूक्ष्म स्वरूपात दिव्य बँकेत जमा करण्याचे काम *अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे, नेणीवपूर्वक, अव्याहतपणे अचूकपणे होत असते.* हे सर्व कार्य गुप्तपणे कसे चालते हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल.
*जर एखाद्या माणसाच्या नकळत टेपरेकॉर्डीगचे मशीन त्याच्या खोलीत चालू करून ठेवले, तर काय परिस्थिती होईल ?*
तो माणूस जे काही बोलेल ते सर्व हे मशीन टेप करील व असा काही प्रकार घडून राहिलेला आहे त्याची पुसट जाणीव सुद्धा त्या माणसाला असणार नाही. परिणामी तो माणूस व त्याच्या घरातील माणसे व त्याच्याकडे येणारी मित्रमंडळी बोलताना किंवा गप्पा मारताना पूर्ण बेसावध व बेफिकीर राहतील आणि बोलू नयेत व इतरांना कळू नयेत अशा कित्येक गोष्टी ते सहज बोलून जातील. *या बेसावधपणाचे अनिष्ट परिणाम त्या घरातील माणसांना भोगावे लागण्याची दाट शक्यता असते.* कारण सर्व बोलणे ज्या व्यक्तीने टेप केले ती व्यक्ती त्या टेपचा दुरूपयोग करू शकेल.
त्याचप्रमाणे *सूक्ष्म जाणीवेचा टेपरेकॉर्डर "निसर्गदेवतेने" प्रत्येक माणसाच्या "जीवनाच्या खोलीत" चालू करून ठेवून दिलेला आहे.*
(क्रमशः)
*लेखक : सद्गुरू श्री वामनराव पै*
(ग्रंथ : तुमचे भाग्य तुमच्या विचारात)
*✍️sp956*

187 

Share


N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad