Bluepad | Bluepad
Bluepad
9. बहिण व भावाचे नाते
औदुंबर नारायण ठाकुर
21st Nov, 2022

Share

या कथेतील पात्रे काल्पनिक असून या कथेशी साधम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती.
एका कुटुंबामध्ये आई बाबा व दोन मुले राहत होती. या मुलगा मोठा असून मुलगी लहान होती. त्याचे १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण चांगले झाले. १२ वीला पण त्याला ७०% मार्क मिळाले. पण मुलगा १३ वी ला गेल्यावर त्या घराचे ग्रह फिरले. दुर्देवाने मुलाला दारूचे व्यसन लागले. तो वाईट मित्राच्या संगतीला लागुन दारू प्यायाला लागला. पहिले खुप कमी पित होता. आईबाबाचे लक्ष त्याच्यावर बिलकूल नव्हते कारण आई व बाबा दोघही कामात मग्न असत. विद्यापिठात जाणारा मुलगा असल्यामुळे आई-बाबा त्याला खर्चाला पैसे देत असत त्याची हा मुलगा दारू पित असे.
कधीकधी तर विद्यापिठाला रजा देऊन दारू पित बसलेला असे. एक दिवस 10 वी ला असलेली बहीण आजारी असल्यामुळे तो थोडी पिऊन घरात आला व बहिणीला बोलला ए चिंगे मला जेवण दे चल खूप भूक लागली आहे. बहिणीने त्याला जेवण देताना तो अभद्र चाळे करू लागला. शेवटी त्याची मजल तिच्यावर हात टाकेपर्यत गेली. तीने त्याला धकलले व ती तीच्या शेजारी राहत असलेल्या मैत्रीणीकडे गेली. ती खूप घाबरली होती.
ती या मैत्रीणीकडे अभ्यासाला जात होती. ही मैत्रीण ११ वी ला होती. मैत्रीणीने तीला सावरले. त्या मैत्रीणीने तीच्या आईला फोन केला. तीची आई म्हणाली की मी संध्याकाळपर्यंत येते. तीची मैत्रीण बोलली लवकर या मग बोलू.
संध्याकाळी ७ वा. तीची आई आली. तेव्हा मैत्रीणीने व तीने सगळी आपबिती सागितली. ती ची आई तीला मैत्रीणीकडे ठेवून गेली. काही वेळानी ती चे बाबा तिच्या घरी आले. त्यावेळी घरी तीला बोलावून घेतले.
तीने दोघांनाही सर्व सांगितले त्यांनी भावाला खुप मारले. आणि तीला सांगितले की तू लवकर घरी येऊ नकोस लायब्ररीमध्ये अभ्यास करत बस व ६ वाजता तूझ्या मैत्रीणीकडे जा. तीथे आई तूला येऊन घरी जाईल. हे भावाने ऐकले व तो क्षमा मागू लागला. पण आई बाबाचा निर्णय झाला होता. त्यात बदल होणार नव्हता. अशा परिस्थितीत त्या बहिणीला ९०% मार्क मिळाले व आई-बाबांनी तीला लेडिज हाॅस्टेलला पाठवायचा निर्णय घेतला व भाऊ यामुळे आणखी दारू पिऊ लागला.
बहिण हाॅस्टेलला चांगली शिकत होती. पण भाऊ मात्र दारू पिऊन झिगत होता. लोक त्याला भडकवित होती. तूझी बहिण हाॅस्टेलला शिकतेय आणि तू बघ तो खुप भडकून आणखीन दारू पीत होता. असच एक वर्ष निघून गेल
एक दिवस त्याच्या बाबांनी एका व्यसनमुक्ती केद्राबाबत वाचल व आई व बाबांनी मिळून निर्णय घेतला की त्याला व्यसनमुक्ती केद्रात पाठवायचा.
ती बहीण १२ वी ला गेली होती. तिला १२ वीला ८५% मार्क मिळाले व ती नोकरी करत पुढे शिकू लागली. ती पूढे १३ वी बीकाॅम ला अर्थशास्त्र हा विषय घेऊन ती पुढे शिकू लागली. ती आता १५ वी ला गेली होती. ती ला १५ वी ला ८०% मार्क मिळाले होते. तीने पुढे अर्थशास्त्र या विषयाची निवड विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी केली व ती तीथेपण चांगल्या मार्कानी पास झाली. चांगल्या मार्कानी पास झाल्यानंतर हॉस्टेल सोडण्याची वेळ आली. ती हॉस्टेल सोडून घरी निघाली ती खुप खुश होती कारण एवढ्या वर्षानी आईबाबांकडे पुढचे दिवस राहायचा अवसर मिळाला होता.
पण एका गोष्टीच वाईट वाटत होत की घरी दादा नसेल. घरी गेल्यावर दादाला जाऊन भेटण्याचा तीने निर्णय घेतला.
आता त्या भावाबाबत बोलूया. त्या भावाने व्यसनमुक्ती केद्रात गेल्यावर त्याच्यात सहा महिन्यात आमुलाग्र बदल झाला. त्याने पुढे शिकायचा निर्णय घेतला. तो ही स्वतःच्या हिमतीवर व्यसनमुक्ती केद्रामध्ये काम करत शिकत होता.
तो मानसशास्त्राचा डाॅक्टर झाला. त्यांनी आपल्या सरावाला त्या केद्रामधूनच सुरूवात केली होती.
पण त्याला घरी येयायची लाज वाटत होती. कारण स्वतःच्या सख्या बहिणीवर हात टाकला म्हणून त्याला अपराध्यासारख वाटत होत. बहिण घरी आल्यावर त्याला आणायला गेली. व त्यानी पण केला होता की ती जीथपर्यत मला क्षमा करत नाही तोपर्यत मी घरी येणार नाही. ती घरी आल्यावर त्याला तीथे आणायला गेली.
तो तीला लाडाने चिंगी बोलत असे. तो तिच्या पाया पडत होता. पण तो मोठा असल्यामुळे तीने त्याला नकार दिला. तो हात जोडून म्हणाला चिंगे मला माफ कर मी खुप चुकलो. बहिणीने त्याला माफ केले व तो भाऊ त्यांच्या घरी गेला. त्यांच्या आई बाबांनाही आनंद झाला.

238 

Share


Written by
औदुंबर नारायण ठाकुर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad